चाकण महात्मा फुले नगर मधील दोन अंगणवाडी मधील सर्व सुमारे 100 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप धान्य ठेवण्यासाठी कोठीचे वाटप

प्रतिनिधी – लहू लांडे.

भारतीय जनता पार्टी चाकण शहर आणि समस्त महात्मा फुले नगर रहिवासी यांच्या वतीने दिनांक 01 ऑगस्ट 2022 रोजी मोठ्या उत्साहामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी चाकण महात्मा फुले नगर मधील दोन अंगणवाडी मधील सर्व सुमारे 100 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप धान्य ठेवण्यासाठी कोठीचे वाटप भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय मनोज शेठ मांजरे यांच्या वतीने करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री मनोज शेठ मांजरे यांच्यासह विद्यमान नगरसेविका सौ सुरेखाताई गालफाडे, भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री राजन भाई परदेशी, आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री गुलाब नाना खांडेभराड, तालुका संघटन सरचिटणीस श्री प्रीतम शिंदे, भाजपा खेड तालुका उपाध्यक्ष श्री अनिल सोनवणे, युवा मोर्चाचे पुणे जिल्हा सरचिटणीस श्री संदेश जाधव, जिल्हा युवा मोर्चाचे चिटणीस श्री शाम पुसतकर, भाजपा कार्यकर्ते श्री महेंद्र गालफाडे, चाकण शहर कार्याध्यक्ष किशोर भुजबळ, उपाध्यक्ष श्री जितेंद्र सोनवणे, अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे शहराध्यक्ष गणेश उंबरे, युवा मोर्चा सरचिटणीस कु.प्रथमेश शिंदे, जयदेव दुधानी, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री प्रतीक गंभीर, भाजपा उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष श्री सूर्यकांत बारणे, भाजपा चाकण शहर सरचिटणीस श्री अर्जुन बोराडे, चाकण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री धीरज मुटके, कै.आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री नितीन गोरे, भाजपा कामगार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री बाळासाहेब नाणेकर, आणि भारतीय जनता पार्टी चाकण शहर अध्यक्ष श्री अजय जगनाडे आणि महात्मा फुले नगर मधील सामाजिक कार्यकर्ते श्री विठ्ठल राव चांदणे, श्री भरत शेठ गालफाडे, श्री पठाण भाई, श्री मनोहर गालफाडे, श्री दादा वैरागी व तमाम सामाजिक कार्यकर्ते आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त देखील अभिवादन करण्यात आले दोन्ही दिवंगत महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी जयंतीनिमित्त तमाम रहिवाशांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर यापुढील काळात महात्मा फुले नगर मधील समस्या सोडविण्यासाठी श्री मनोज शेठ मांजरे आणि नगरसेविका गालफाडे ताई यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आवाहन करण्यात आले.

त्याचबरोबर सदर कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री मनोज शेठ मांजरे यांच्यासह शहराध्यक्ष अजय जगनाडे, श्री डॉ.महेंद्र गालफाडे, श्री एडवोकेट प्रीतम अण्णा शिंदे आदी कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले…!

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!