अमरावती-ओम मोरे
राष्ट्रीय व्हायरल हिपॅटाटीस नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती द्वारे दि.२८ जुलै २०२२ रोजी ‘जागतिक व्हायरल हिपॅटाटीस दिन-२०२२’ साजरा करण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयातून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. प्रमोद निरवणे जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती व प्रमुख पाहुणे मा. डॉ. राजकुमार दासरवाड, समाजकार्य महाविद्यालय, बडनेरा यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला शुभेच्छा दिले. रॅलीची सुरवात जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती ते पंचवटी चौक अमरावती असे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. प्रीती मोरे मॅडम, डॉ. सुयोगा पानट, डॉ. अनिता बोबडे, डॉ. मोनाली ढोले, डॉ. विशाल काळे, डॉ. पौर्णिमा उघडे मॅडम, श्रीमती देशमुख मॅडम (आहारतज्ञ), श्री. अजय साखरे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, श्रीमती ललिता अटाळकर (मेट्रंन), इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. संदेश यमलवाड, रक्त संक्रमण अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती व श्री. रविंद्र चंद्रे, यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उद्धव जुकरे यांनी केले. आभार प्रदर्शन रविंद्र चंद्रे यांनी केले तर नर्सिंग कोलेजच्या श्रीमती प्रीती पवार, श्रीमती मेंडे मॅडम, श्रीमती सिंधु खाणंदे, श्रीमती शुभांगी लायसे, श्री. सचिन वानखेडे, श्री. रुपेश टेनग्ने, आशावर्कर आणि सहाय्यक परिचारिका व नर्सिंग कॉलेजच्या विदयार्थीनी सोबत विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.