स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे – तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गवरील पावसाळ्यात खड्यांनी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वाहन चालक आपला जीव मुठीत धरून आपली वाहने चालवत आहेत. अनेकांनी या खड्ड्यामुळे आपले प्राण गमावले असुन अजूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधीकडुन यावर ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.त्यामुळे वाहतूककोंडी,व खड्डयांचा त्रास हा नागरिकांना सहन करावा लागत आहे.,या खड्डे पडलेल्या रस्त्यावर चाकण ट्रॅफिक विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठपुरावा केल्याने (NHAI) आज चाकण येथील माणिक चौकातील रस्त्याला पडलेले खड्डे बुजवन्यात आले.त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु या रस्त्यावरील वाहनकोंडी,व खड्डयांच्या त्रासातून कधी कायमस्वरूपी सुटका होणार याकडे चाकणकरांचे लक्ष लागले आहे.

तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेली औद्योगिक नगरी व अनेक गावे या महामार्गाला जोडलेली आहेत. त्यामुळे येथील रहदारी, व अवजड वाहने ही 24 तास या मार्गावर चालू असते. त्यामुळे हा महामार्ग सतत चालू असतो. परंतु पावसाळा आला की या राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था होऊन अनेक वाहन चालकांना आपला प्राण गमवावा लागत आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पडलेल्या खड्डयांनी अनेकांचे जीव जाऊन मोठे अपघात होत आहेत. त्यातच काही ठिकाणी रस्त्यावर,खड्यांमध्ये पाणी साचत असल्याने मोठा त्रास वाहन चालकांना व नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यातच या मार्गावरील होणारी वाहतूक कोंडीची समस्या अनेक उपाय करून देखील अजुन कोणाला सुटलेली नाही. या दुहेरी कोंडीमुळे वाहनचालक अक्षरशः वैतागले आहेत. त्यामुळे चाकण ट्रॅफिक विभाग या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना पत्र देण्यात आले होते. याचा पाठपुरावा केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या महामार्गावरचे खड्डे बुजवन्यात सुरवात केली आहेत.

आज चाकण माणिक चौकात रस्त्याला पडलेले खड्डे बुजवल्याने वाहन चालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु दरवर्षी पावसाळ्यात या महामार्गवर खड्डे पडून रस्त्याची चाळण होते. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना या मार्गाला होणार का नाही असा प्रश्न आता चाकणकरांना पडला आहे.