स्वराज वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे

पुणे – श्रावण महिना हा पंचांगानुसार 4 महिन्यात येत असतो. या महिन्यात महादेवाची भक्तिभावाने दर श्रावणी सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी मनोभावे पुजा अर्चा केली जाते.तसेच या महिन्यात येणारे सण हे मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. यामुळे मोठे महत्त्व या श्रावण महिन्याला आहे.
आज चाकण येथील पुरातन काळापासून असलेल्या श्री चक्रेश्वर मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने भक्तांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. अनेक भाविक चाकण परिसरातुन महादेवाच्या दर्शनासाठी आलेले होते. पहाटे महापुजा झाल्यानंतर मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे सकाळपासूनच भोलेनाथाच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. चक्रेश्वर मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर उजळून निघालेला पहायला मिळाला. व भोलेनाथच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना रांगेत शांततेत दर्शन घेता यावे यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अमरनाथ सेवा मंडळाकडून आलेल्या भाविकांना खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आल्याने अनेक भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी दिवसभर आलेल्या भक्तांना महाप्रसादाची सोय करून दिली.
