
स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे – सध्या श्रावण महिना चालू झाला आहे. या महिन्यातील उद्या पहिल्या सोमवारची जय्यत तयारी चाकण येथील पुरातन मंदिर असलेल्या श्री चक्रेश्वर मंदिर देवस्थान केली आहे.तसेच उद्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरातील अभिषेक देवस्थान कडुन बंद केला असुन फक्त दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात येणार असल्याचे देवस्थान ट्रस्ट कडुन सांगण्यात आले.

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची मनोभावे पूजा,प्रार्थना भक्तांकडून केली जाते. या दिवशी अनेक भाविकांकडून उपवास देखील केला जातो.यावेळी अनेक भोलेनाथ भक्त हे मंदिरात जाऊन महादेवाची पुजा-अर्चा करत असतात. चाकण येथील पुरातन काळापासून असलेल्या श्री चक्रेश्वर मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी अनेक भाविक येतात. दरवर्षी या ठिकाणी श्रावण महिन्यात मोठी यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने या वर्षी देखील चक्रेश्वर देवस्थान ट्रस्टकडुन जय्यत तयारी करण्यात आली आहे. आलेल्या भाविकांना रांगेत दर्शन घेता येण्यासाठी सोय केली आहे. उद्या होणारी मोठी गर्दीसाठी चाकण पोलीस स्टेशनकडुन पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मंदिरातील सर्व अभिषेक या वर्षी बंद करण्याचा देवस्थानकडुन निर्णय घेण्यात आला असुन फक्त आलेल्या भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच भाविकांनी बेल,फुले, पाणी महादेवाच्या पिंडीवर वाहण्याचे आवाहन देवस्थान कडुन करण्यात आले आहे. तसेच मंदीर परिसर, गाभारा, स्वच्छ करण्याचे काम आज चालू असलेले पहायला मिळाले. उद्या काही भोलेनाथ सेवा मंडळाकडून आलेल्या भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. त्याची देखील लगभग आज मंडळाचे कार्यकर्ते करत होते.
एकूणच उद्या होणाऱ्या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारची जय्यत तयारी श्री चक्रेश्वर देवस्थानकडुन करण्यात आली असुन सर्व भाविकांना शांततेत दर्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.