पुणे जिल्हा परिषद व खेड पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे

पुणे :- पुणे जिल्हा परिषद व खेड तालुका पंचायत समितीची आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या 9 गटाची व खेड पंचायत समितीच्या 18 गणाची आरक्षण जाहीर झाले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या 9 गटाचे आरक्षण पुढीलप्रमाणे..

१) नायफड – आवदर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

२) वाडा – सातकरस्थळ सर्वसाधरण पुरूष

३) रेटवडी – कनेरसरसर्वसाधरण महिला

४) पिंपळगाव – काळूस सर्वसाधारण महिला

५) शिरोली – कडूससर्वसाधरण महिला

६) पाईट – कुरकुंडीसर्वसाधरण महिला

७) आंबेठाण – महाळुंगेनागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष

८) नाणेकरवाडी – मेदनकरवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

९) कुरुळी – मरकळनागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.

तसेच खेड पंचायत समितीच्या 18 गणाचे आरक्षण पुढीलप्रमाणे..

१) नायफड – सर्वसाधारण पुरुष

२) औदर-सर्वसाधारण पुरुष

३)वाडा – सर्वसाधारण स्त्री

४) सातकर स्थळ -सर्वसाधारण पुरुष

५) रेटवडी -सर्वसाधारण पुरुष

६) कनेरसर -सर्वसाधारण स्त्री

७) पिंपळगांव तर्फे खेड- सर्वसाधारण पुरुष

८)काळुस – सर्वसाधारण स्त्री

९)कडुस – सर्वसाधारण पुरुष

१०)शिरोली – अनुसूचित जाती स्त्री

११)पाईट – नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष

१२) पिंपरी बुद्रुक – सर्वसाधारण स्त्री

१३) महाळुंगे – अनुसूचित जमाती पुरुष

१४) आंबेठाण – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

१५) नाणेकरवाडी- सर्वसाधारण स्त्री

१६) मेदनकारवाडी – सर्वसाधारण पुरुष

१७)कुरुळी – सर्वसाधारण स्त्री

१८)मरकळ – अनुसूचित जमाती स्त्री

असे आरक्षण जाहीर झाले असुन इच्छुक असलेले गावा-गावातील उमेदवार काहींना आनंद झाला आहे. तर काहींच्या हिरमोड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.यासाठी अनेकांनी गेल्या काही महिन्यांपासून आपले वर्चस्व पणाला लावले होते. पण आता आरक्षण जाहीर झाल्याने आता ते कोणत्या पक्षातील उमेदवाराला साथ देणार हेच पाहावे लागेल.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!