नांदगाव खंडेश्वर / ओम मोरे
नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत अंतर्गत अग्निशामक वाहनाचे लोकार्पण व तालुक्यात चार गावात रस्त्यांचा भूमिपूजन सोहळा आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते पार पडला त्यासोबतच तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली अधिकार्यांना तातडीने अहवाल सादर करण्याची आदेश दिले.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पळसमंडळ,धानोरा गुरव, भागुरा व कोठोडा या गावात 12 लक्ष रुपयाचा भूमिपूजन सोहळा तर नांदगाव खंडेश्वर शहराचे नगरपंचायत ची स्थापना झाल्यानंतर 2018 मध्ये तत्कालीन संजय पोफळे यांनी नगरपंचायत व तालुक्याला अग्निशामक वाहनाची आवश्यकता असल्याने तसा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर तयार करून पाठविण्यात आला त्यानंतर खासदार रामदास तडस व आमदार प्रताप अडसड यांच्या सतत प्रयत्न मुळे अखेर आज नांदगाव नगरपंचायत ला अग्निशामक दलाचे वाहन 80 लक्ष रुपयाचे त्यानंतर आमदार प्रताप अडसड यांनी नांदगाव खंडेश्वर येथे वाहनाचे पूजन करून लोकार्पण केले व त्याच्यासह तालुक्यातील धानोरा गुरव येथे तीन लक्ष रुपयाचा रोड,पळसमंडळ येते तीन लक्ष रुपयाचे पेरिंग ब्लॉक व इतर कामे, तर कोठोडा व भगूरा येथे सिमेंट काँक्रेट रस्त्यांचे सहा लाख रुपयाचे कामाचं भूमिपूजन सोहळा पार पडला तर याच वेळी तालुक्यातील नुकसान ग्रस्त गावांमध्ये पाहणी केली यावेळी आमदार प्रतापदादा अडसड, हरिश्चंद्र खंडाळकर पाटील,माजी नगराध्यक्ष संजय पोफळे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे, शहराध्यक्ष नवल खिची, प्रशांत वैद्य,भाजपचे घनश्याम सारडा, प्रदीप जोशी,माजी नगरसेवक सतीश पटेल, माजी जिल्हा परिषद सदस्य निशांत जाधव, माजी नगरसेवक अरुण लाहबर, मोहम्मद साजिद, अमोल मारोटकर,भाजपा अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अजगर पठाण, युवा सेना माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर, अविनाश ब्राह्मणवाडे, निकेश ब्राह्मणवाडे, मनीष जाधव, पांडुरंग काकडे, मंगेश मानके, आशिष रावेकर, किशोर करोडे, रुद्रेश शिंदे, मनोहर नरखेडकर, विलास वीतोंडे, विलास जाधव, ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव, राजूभाऊ गभने, शिवा उईके, नयन कणसे,धनंजय भडके, पवन जोशी यांच्यासह तालुक्यातील तथा शहरातील भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते