नांदगाव खंडेश्वर/ओम मोरे
पळसमंडळ येथे सन २०१७-१८ पासून आरोग्य उपकेंद्राची इमारतीचे बांधकाम झाले असून अद्यापही त्या उपकेंद्रात आरोग्य उपचार सुरू झाल्याने तेथील वास्तू बंद अवस्थेत असल्याने तातडीने आरोग्य उपकेंद्र मध्ये उपचार सुरू करण्याची मागणी पळसमंडळ येथील सरपंच यांनी निवेदनाद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली.
गावासह परिसरातील रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून पळसमंडळ येथे आरोग्य उपकेंद्र इमारतीचे सन २०१७-१८ मध्ये बांधकाम करण्यात आले परंतु अद्यापही त्या इमारतीमध्ये रुग्णांवर उपचार सुरू झाल्याने गावासह परिसरातील नागरिकांना उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र पापड किंवा तालुका स्तरावर जावे लागते तेव्हा हा उपचार गावातच सुरू झाल्यास गावांसह परिसरातील नागरिकांना सोयी उपलब्ध होईल व रुग्णांची गैरसोय होणार नाही तेव्हा बांधलेले उपकेंद्राची वास्तू सुद्धा जीर्ण न होता तिथे रुग्णांना उपचार मिळेल तेव्हा तातडीने तिथे पदभरती करू रुग्णांवर उपचार करा अशी मागणी पळसमंडळ येथील सरपंच यांच्या निवेदनाद्वारे ग्रामपंचायत सदस्य निखिल मोरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमाले यांच्याकडे केली आहे