
मिलींद मधुकर गुंजाळ, वय ३२ वर्षे, धंदा नोकरी रा. संगमनेर जि. अहमदनगर यांनी चाकण पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली की, आरोपी नामे सनी अनिल दाते रा. पाषान पुणे याने OLX ॲपवर मारूती सुझुकी ब्रिझा कार नं एम एच १२ पी एच ५५५४ ही विक्रीसाठी ठेवलेली होती. त्यावेळी मिलींद गुंजाळ यांना सदर कार आवडल्याने त्यांनी सनी दाते याचे फोनवर फोन करून संपर्क केला असता त्याने सांगीतले मी आर्थीक अडचणींमध्ये असल्याने मला सदर कार विक्री करायची आहे. तेंव्हा मिलींद गुंजाळ हे सदर कार विकत घेण्यास तयार झाले. त्यांचा ६,७०,०००/- रु. मध्ये व्यवहार झाल्यानंतर सनी दाते याने ११००/- रूपये टोकनसाठी मागीतल्याने त्यांनी ११००/- रू. ऑनलाईन पाठविले. त्यानंतर दिनांक २१/०७/२०२२ रोजी सनी दाते याने मिलींद गुंजाळ यांना गाडी खरेदीचे रोख रक्कम घेवुन मेदनकरवाडी चाकण येथील तिरंगा हॉटेल जवळ बोलावले. तेंव्हा मिलींद गुंजाळ व त्यांचे सहकारी हे सदर गाडी खरेदीसाठी रोख रक्कम घेवुन गेले असतांना आरोपी सनी दाते याने ६,२०,०००/- रोख रक्कम घेतली व गांडी आळंदी फाटयावर देतो असे म्हणुन फिर्यादी यांना ब्रिझा गाडीमध्ये आळंदी फाटयावर घेवुन गेला त्यावेळी त्यांना फसवुन गाडीतुन खाली झेरॉक्स काढण्यासाठी उतरविले व सनी दाते हा गाडी घेवुन पळुन गेलेला आहे. या आशयाचे तक्रारीवरून चाकण पोलीस स्टेशन गुरनं ११७५ / २०२२ भादवि कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी सदर गुन्हयातील आरोपी शोधासाठी डी. बी. पथकाला सुचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार डि. बी. पथकाचे सपोनि विक्रम गायकवाड व स्टाफ यांनी सदर गुन्हयातील आरोपी सनी सुनिल दाते यांची माहिती घेण्यास सुरूवात केली असता सनी दाते याने फिर्यादीस दिलेल्या पत्याचे पाषान पुणे येथील घर दोन वर्षापुर्वी विक्री केलेले असल्याचे समजले. त्यानंतर आरोपीची गोपनीय माहिती तसेच त्याचे मोबाईल नंबरची तांत्रीक माहिती घेवुन सदर आरोपीस कारसह अतीशय शिताफिने तळेगाव परीतसरात मुंबई-पुणे महामार्गावरील टोलनाक्यावर सापळा रचुन ताब्यात घेतले. सदर आरोपीकडुन गुन्हयातील ब्रिझाकार व तसेच फिर्यादी यांचे रोख रक्कम ६,००,०००/- रु. असा एकुण १२,००,०००/ रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला असुन सदर आरोपीस गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. त्याची दिनांक २४/०७/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर आहे.
सदर गुन्हयातील आरोपी सनी सुनिल दाते वय ३१ वर्षे, रा. सुसगाव पुणे याने OLX ॲपवर वरील ब्रिझा गाडी विक्रीसाठी ठेवुन पुणे परीसरात आणखी ठिकाणी अशा प्रकारे लोकांची फसवणुक केली असल्याचे तपासात समोर आलेले आहे. सदर बाबत लोकांना आवाहन करण्यात येते की, सनी सुनिल दाते याने अशा प्रकारे कोणाची फसवणुक केली असल्यास त्यांनी संबंधीत पोलीस स्टेशलला तक्रार दाखल करावी.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. अंकुश शिंदे साहेब, अपर पोलीस आयुक्त, श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १ श्री. मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सपोनि प्रसंन्न ज-हाड, सपोनि विक्रम गायवाड, सफौ सुरेश हिंगे, पोहवा संदिप सोनवणे, पोना हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, सुदर्शन बर्डे, निखील शेटे, पोका प्रदिप राळे, चेतन गायकर, नितीन गुंजाळ, निखील वर्पे, मपोना भाग्यश्री जमदाडे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि विक्रम गायकवाड हे करीत आहेत.