नांदगाव खंडेश्वर/ ओम मोरे
तालुक्यामध्ये येणाऱ्या मौजे जावरा मोळवण येथील बेंबळा नदीच्या पात्रात खूप जास्त प्रमाणात काटेरी झाडे झुडपे झाल्यामुळे येणाऱ्या पुराच्या पाण्याने गावाला व नदीजवळील शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला व शेतकऱ्यांचे खूप सारे नुकसान झाले. बेंबळा नदी ही काही वर्षापासून काटेरी झुडपानमुळे पूर्णतः नष्ट झालेली आहे. दरवर्षी येणाऱ्या पावसाळी महिन्यात नदीला पूर येतो. काटेरी झुडपान मुळे येणारा पूर नदीने वाहून न जाता गावाकडे पसरतो त्यामुळे जावरा मोळवण या गावाला धोका दिसून येत आहे. बरेचदा गावापर्यंत पाणी आले. घर सोडून जायची परिस्तिथी गवकर्यांवर आली.त्याचबरोबर शेती शेतातील पिके दरवर्षी खराब होतात. गावाचे खूप मोठे नुकसान होते. गाव समृद्ध होत नाही आणि त्यामुळे जावरा मोळवण येथील गावकरी आर्थिक दृष्ट्या गरीब होत चाललेला आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नसून प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. म्हणून जावरा मोळवण येथील बेंबळा नदीची साफसफाई व खोलीकरण करण्याची आवश्यकता आहे. असे निवेदन खंडाळा खुर्द येथील सरपंच तथा तालुका सरपंच संघर्ष संघटन चे कार्याध्यक्ष उमेश दहातोंडे यांनी मा. तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांना निवेदन दिले. त्यावेळी जावरा मोळवण येथील उमेश दहातोंडे व रोहना येथील प्रतिष्ठित नागरिक योगेश ताथोड तसेच नितेश भाऊ काकडे, अजय दहातोंडे सोबत होते.