स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे – काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॅबिनेट बैठकीत पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्याची अंमलबजावणी काल मध्यरात्री 12 वाजल्यापासून करण्यात आली. त्यामुळे चाकण शहरातील पेट्रोलचे दर 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 3 रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळाले.यामुळे चाकणकरांनी व कामगार वर्गानी समाधान व्यक्त केल्याचे दिसुन आले.

राज्यात पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले होते. त्यातच महाविकास आघाडीच्या काळात याची भरमसाठ वाढ झाल्याने सर्व सामान्य कामगार वर्ग, व्यापारी, व सामान्य नागरिकांचे जीवनमान आर्थिक गणित कोलमडले होते. मात्र नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-भाजप सरकारने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीवरील व्हॅट कमी करण्यासाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. ही बैठक राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यामध्ये अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.

त्यातच पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी कमी करून सामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी कमी करण्यात आले. यामुळे आज चाकणमधील पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच वाहन चालकांनी यामुळे समाधान व्यक्त केले आहे. अजुनही पेट्रोलचे दर शिंदे सरकारने कमी केल्यास नक्कीच आम्हाला व सामान्य जनतेला आनंद होईल अशी अपेक्षा एका वाहन चालकाने स्वराज्य वार्ताशी बोलताना सांगितली.