स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे – चाकण पासुन अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या रासे गावातील जागृत देवस्थान असलेल्या रेणुका देवीच्या मंदिराचे अर्धवट काम बाकी राहिले आहे. गेली 4 5 वर्षे मंदिराचे कामाचा विकास झाला नसल्याने मंदिराचे अर्धवट काम तसेच पडून राहिले आहे. त्यामुळे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका देवीच्या मंदिराचे काम पुर्ण कधी होणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

रासे गावातील डोंगरावर असलेल्या रेणुकामातेच्या दर्शनासाठी अनेक भाविक पंचक्रोशीतील गावांतून येत असतात. तसेच रेणुका देवी नवसाला पावणारी देवी म्हूणून देवीचा नावलौकिक भाविकांमध्ये आहे. दरवर्षी नवरात्र उत्सवात नऊ दिवस देवीचा जागर हा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. तसेच आषाढ महिन्यात देवीचा भंडारा साजरा करून आलेल्या भक्तांना महाप्रसादाचा वाटप केले जाते.या दिवशी संपूर्ण गावात मोडा पाळला जातो.

यावेळी देखील अनेक पंचक्रोशीतील भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. परंतु गेली 4 5 वर्षांपासून देवीच्या मंदिराचे पडझड झाली असुन, मंडपाचे पत्रे देखील उडाले आहेत.काही ठिकाणी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या देखील मोठ्या प्रमाणात तुटलेल्या आहेत. मंदिराशेजारील बांधलेल्या पाण्याच्या टाक्या ह्या रिकाम्या अवस्थेत पडलेल्या असुन असुन अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.त्यातच मंदिराचा पुढील असलेला चौथरा भाग एका बाजूने कोसळला असुन अपघाताला निमंत्रण झाले आहे.

तसेच मध्यंतरी सभामंडपसाठी उभे करण्यात आलेले खांब संबधित ठेकेदाराने सोडून दिल्याने तसेच पडून आहेत.मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात चिखल साचत असल्याने तो रस्ता काँक्रीटीकरण करण्यात यावा अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.देवीच्या मंदिरावर असलेले रेणुका देवीचे नाव काही महाभागांनी खोडल्याने ते विद्रुप झाले आहे. अशी रेणुका देवीची मंदिराची अनेक कामे राहिली असुन गावातील राजकीय, सामाजिक पुढाऱ्यांकडून लक्ष दिले जात नसल्याचे देवीचे मंदिराचे अर्धवट तसेच राहिले आहे.तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या माध्यमातून मंदिरासाठी 10 लक्ष रुपयांचा निधी मागील काळात मंजूर करण्यात आला होता. परंतु 2 वर्ष होऊन देखील मंदिराचे काम अर्धवट स्थितीत जैसे थे राहिले आहे.

देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांकडून अनेक देणग्या ह्या दिल्या जातात परंतु त्यातुन देखील कामांचा विकास होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. गावातील काही राजकीय मंडळी तर फक्त नावासाठी हजेरी लावत आहेत. त्यामुळे नक्की जबाबदार व्यक्तीच कोणी नसल्याने मंदिराचा विकास होणार कसा ? असा प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे.या व्यक्तींनी जागृत देवस्थान असलेल्या रेणुका मातेच्या मंदिराच्या विकासाकडे लक्ष दिले तर ते काम नक्कीच पूर्णत्वाकडे गेल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
प्रतिक्रिया १-
रासे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व लोकवर्गणीतून गोळा झालेल्या पैशातून सध्या काम चालू केले आहे. तसेच विद्यमान आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांनी देखील 5 लाखांचा निधी वाढून दिल्याने लवकरच मंजूर होऊन कामाला सुरवात होईल.किरण ठाकर (सरपंच)
प्रतिक्रिया २-
आता सध्या जागृत देवी असलेल्या रेणुका माता मंदिराला कोणी जबाबदार व्यक्तीच नसल्याने तेथील विकास हा खोळंबला आहे. या जागृत देवस्थानसाठी मंदिर ट्रस्ट स्थापन करून नक्कीच रेणुकामाता देवस्थानचा व परिसराचा विकास होण्यास मदत होईल.अनिकेत केदारी संचालक,रासे वि.वि.सोसायटी)