चाकण वार्ताहर: लहू लांडे
गुरू ब्रम्हा गुरू विष्णू ll
गुरू देवो महेश्वर: ll
गुरू साक्षात परब्रम्ह ll तस्मायी श्री गुरुवें महा: ll आपले पहिले गुरू – आई वडील असतात. या उक्तीला अनुसरून चाकण येथील विश्वशांतिनिकेतन विद्यालय आणि संतोष ऑल राऊंडर ॲकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांनी आई वडिलांची पूजा, नमस्कार करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सरस्वती पूजा, हवन करून सर्व विद्यार्थ्यांचा सामुदायिक पालकांच्या हस्ते श्री. अमर जोशी शास्त्री यांच्या उपस्थित विद्यारंभ संस्कार ही संपन्न झाला. विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. गुरुपौर्णिमेनिमित्ताने विद्यार्थ्यांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांवंदन केले.
आदर्श शिक्षिका उपप्राचार्या सौ. संध्या जाधव, सौ. अश्विनी गोरे, आदर्श पालक सौ. पल्लवी पवार, पर्यवेक्षिका सौ. रुपाली हुलुळे, सौ. रुपाली क्षीरसागर, सहशिक्षिका रेश्मा जाधव, सादिया पठाण, मिसबा काझी, हर्षदा गोरे या गुरुजनांची पूजा आणि औक्षण करून गुलाब पुष्प देऊन प्राचार्या अर्चना प्रविण आघाव यांनी सर्वांना सन्मानित केले.
गुरुपौर्णिमे निमित्ताने योग गुरू प्रा. प्रविण आघाव यांचा लोकमान्य मल्टी. को. ऑ. बँकेचे शाखाधिकारी श्री. माधव खर्डे, बँक अधिकारी सौ. सुजाता वायाळ यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
आपली भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, गुरू शिष्य परंपरा टिकावी. गुरू, प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकांचे महत्व असते. गुरू प्रति आदर व्यक्त करण्याचा दिवस गुरुपौर्णिमा असतो, हे नवीन आणि भावी पिढीला समजावे. या उद्देशाने विश्वशांतिनिकेतन विद्यालय आणि संतोष ऑल राऊंडर अॅकॅडमीमध्ये गुरुपौर्णिमेचे वेगळ्या पद्धतीने आयोजन केले होते. अशी माहिती प्राचार्या अर्चना आघाव यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन सौ. रेश्मा जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. उपप्राचार्या संध्या जाधव यांनी केले.
