पालघर वार्ता -: दसऱ्यादिवशी होणाऱ्या रावणदहन कार्यक्रमाच्या आयोजनावरून पालघर जिल्ह्यातील आदिवासी संघटना एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. भूमी सेनेचे काळूराम धोदडे अध्यक्ष असलेल्या आदिवासी एकता परिषदेने आदिवासी राजा रावणाच्या दहनाला विरोध दर्शवत रावण पूजेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले तर भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि आदिवासी एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष जनाठे यांनी जिल्ह्यातील आदिवासी रामाला दैवत मानत असून, काही आदिवासी संघटना आदिवासांची दिशाभूल करीत असल्याचे सांगत रावण पूजेला विरोध असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
खडेश्वरी रावणाच्या नाका येथे राजा प्रतिमेचे आदिवासी समाजातर्फे पुजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रावणाच्या चांगल्या गुणांबद्दल शंका नसल्याचे सांगत आदिवासी एकता मित्र मंडळाने रावण पूजेस विरोध केला असून, रावण पूजेला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाज रामचंद्रांना आपले दैवत मानतो. लग्न समारंभात राम नाम’ जपत सुखी संसाराला सुरुवात केली जाते. आदिवासी समाज रामाचे वारस आहेत.
समाजात भेद निर्माण करणान्या संघटना रावणाला आदिवासांचा राजा मानणे चुकीचे आहे. रामाचा अपमान करणाऱ्या रावणाचे पूजन पालघर जिल्ह्यातही होता कामा नये. तसेच रावणाचे पूजन न होता दहनच झाले पाहिजे, अशी भूमिका घेत पालघर जिल्ह्यात रावण पूजा होऊ देऊ नये, अशी विनंती पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.