प्रतिनिधी फुलचंद भगत :-
वाशिम:-अत्यंत हलाखीच्या परिस्थीतीत आपले इमानेईतबारे कर्तव्य बजावणार्या एस टी महामंडळाच्या कर्मचार्यांनी आतातरी आम्हाला शासनामध्ये विलिनीकरण करुन आवश्यक सोईसुविधा ऊपलब्ध करुन द्या या मागणीसाठी पुकारलेला संप अजुनही सुरुच असुन प्रशासनाने त्वरीत तोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरत आहे.

तुटपुंज्या पगारावर आपले कर्तव्य बजावणारे एस टी महामंडळाचे कर्मचारी आता शासनामध्ये विलीनीकरण या प्रमुख मागणीसह कर्तव्यावरील कर्मचार्यांना सोईसुविधा पुरवाव्यात अशा मागणीसाठी कर्मचारी एकजुट होवुन न्याय मिळन्यासाठी आक्रमक झाले असुन संपाचे हत्यार ऊपसले आहे.
