स्व.आमदार सुरेश गोरे यांचे बंधु नितीन गुलाबराव गोरे यांची महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ मुंबई च्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकारच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले. राष्ट्रीय मानवाधिकार महीला अध्यक्षा संगिता नाईकरे, महाराष्ट्र राज्य सचिव नलीनी चव्हाण, पुणे जिल्हा उपाध्यक्षा रंजना चन्ने, पुणे जिल्हा सचिव पुष्पा मुथ्था यांच्या सहीत अनेक महीला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडीया (आठवले) व्यापारी आघाडी महाराष्ट्र राज्य सचिव तथा वाहतुक महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सचीन वाघमारे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष वैजनाथ मुगावकर, खेड तालुका अध्यक्ष नाना गांधिले हे देखील उपस्थित होते.