
पिंपरी चिंचवड :रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीया (आठवले) यांच्यावतीने राज्य सचिव मा.हरेशभाई देखणे गुरुवार दि.12 /05/2022 रोजी सांगवी पोलिस स्टेशन समोर जाहिर धरणे आंदोलन करण्यात आले.
रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते यशवंत सुर्यवंशी यांच्यावर 27 फेब्रु.2022 रोजी जिवघेणा हल्ला झाला होता. “तीन महिने उलटुनही अद्याप पोलिसांनी गुन्हे दाखल केले नसून सांगवी पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. भोगम यांनी यशवंत सुर्यवंशी यांच्यावरच दबाव टाकत आरोपींच्या वतीने मध्यस्थी केली व यशवंत सुर्यवंशी यांचा जुना मोबाईल जप्त करत जबरदस्ती नविन मोबाईल देऊ केला तसेच प्रकरण ईथेच थांबव अन्यथा तुझ्यावर आरोपीच्या बहिणीमार्फत 354 दाखल करतो असे धमकावलेचे सुर्यवंशी यांनी सांगितले”.चळवळीतील कार्यकर्ता असल्याने आपल्यावर अन्याय होतोय याची सुर्यवंशी यांना जाणिव होत असल्याने त्यांनी अँट्रोसिटी अँक्ट अंतर्गत गुन्हे दाखल व्हावेत यासाठी पोलिस आयुक्त तसेच संबंधित अधिकार्याशी पत्रव्यवहार केला. तसेच या संदर्भात यशवंत सुर्यवंशी यांनी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीयाचे प्रदेश सचिव हरेशभाई देखणे यांच्याकडे तक्रार केली असता सदर आंदोलन करण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवड शहराचे माजी अध्यक्ष मा.सुरेश निकाळजे यांनी या हल्लाचा तिव्र शब्दात निषेध केला. तसेच आरोपी हर्षवर्धन राक्षे व सलमान खान तसेच 20 ते 25 आरोपींवर IPC कलमांअंतर्गत तसेच अँट्रोसिटी अँक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. रिपब्लिकन श्रमिक ब्रगेड चे प्रदेश सचिव अँड.अरुण सोनवणे यांनी यशवंत सुर्यवंशी यांना कायदेशीर सर्वतोपरी मदत करणार असल्याचे जाहीर केले. मा.विशालआप्पा कदम यांनी यापुढे जर असा हल्ला कार्यकर्तांवर झाला तर जशास तसे उत्तर देऊ असे सांगितले. ए.पी.आय. भोगम यांच्यावर कारवाई झालीच पाहीजे अश्या यावेळी आंदोलकांनी उस्फूर्तपणे घोषणाबाजी करत पोलिस स्टेशनचा परिसर दणाणुन सोडला.

घोषणाबाजी करत आंदोलकांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक मा.सुनिल टोन्पे यांची भेट घेत त्यांना धारेवर धरले.मा.हरेशभाई देखणे यांनी ३ महिने होऊनही गुन्हे का दाखल झाले नाहीत? याचा जाब विचारला .मध्यस्थी करणारे API भोगम यांच्याकडुन ताबडतोब तपास काढण्यात यावा. तसेच जर चार दिवसात आरोपींवर अँट्रिसिटी अँक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झाले नाही तर डीसीपी कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेऴी वरिष्ठ पोलिस नि्रिक्षक टोन्पे साहेब यांनी वरिष्ठांशी बोलुन दोन दिवसात गुन्हे दाखल करु. तसेच तपास अधिकारी म्हणुन API भोगम यांना हटविणार असल्याचे सांगितले. यावेळी रिपाइं (आठवले)चे हरेशभाई देखणे,सुरेश निकाळजे,अँड.अरुण सोनवणे,मा.विशाल आप्पा कदम,मा.रमेश गजरमल,मा.सत्तारभाई शेख,मा.आसिफभाई शेख,मा.गौतम सुराडकर,मा.सुरेखाताई गोतारणे,मा.आशा तिकोटे इ.कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.