चाकण नगरपरिषदचे नवनियुक्त मुख्याधिकारी सुनिल बल्लाळ
यांची आज बुधवार दि.११/०५/२०२२ रोजी महात्मा फुले नगर विकास मंच चे पदाधिकारी यांनी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी महात्मा फुले नगर विकास मंच च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सुनिल बल्लाळ यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच यावेळी महात्मा फुलेनगर येथिल ग्रामस्थांनी विविध
प्रश्नावर चर्चा केली व मुख्याधिकारी यांना परिस्थिती ची जाणीव करून दिली. यावेळी मुख्याधिकारी सुनिल बल्लाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच प्रधानमंत्री योजने अंतर्गत “सर्वां साठी घरे” यातील घरे पूर्ण करण्यासाठी महात्मा फुले नगर मधील लाभार्थींना पुर्णतः सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी महात्मा फुले नगर विकास मंचचे अध्यक्ष- चन्द्रकांत बचुटे, कार्याध्यक्ष-बाळासाहेब झाडे, खजिनदार-बाळासाहेब गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते -काशिनाथ बनसोडे, महात्मा फुले नगर विकास मंचचे पदाधिकारी सिद्धीक शेख व अशोक शिरसाट, महात्मा फुले नगर विकास मंचचे आधार स्तंभ-मा.युवराज गालफाडे आदी उपस्थित होते.
यावेळी सर्वांच्या वतीने नवनियुक्त मुख्याधिकारी सुनिल बल्लाळ यांचे आभार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पदवीधरआघाडी खेड तालुका अध्यक्ष गौतम वाव्हळ यांनी मानले.