परतवाडा येथील कांडली या ठिकाणी गॅस गोदामाला भीषण आग

अमरावती जयकुमार बुटे

आज सकाळी अमरावती : जिल्ह्यातील अचलपूरमधील कांडली गावात आज सकाळी दि.24 रोजी येथील गॅस कंपनी गोडाऊनला लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या लोकांवर वस्तीमधून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

साधारणत 8 ते 10 सिलेंडरचा ब्लास्ट झाला मोठा जोरात आवाज येत होते त्या सिलेंडरचे लोखंडाचे टापरे आजूबाजूच्या लोकांच्या घरांमध्ये गेले त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे आग कशामुळे लागली तपास चालू आहे आज 45℅ डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये परतवाडा आणि धारणी चिखलदरा परिसरातील उन्हामुळे जंगलांमध्ये आग लागत आहे हेच कारण असू शकते असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

आगीची घटना घडताच परतवाड्याच्या ठाणेदार संतोष ताले अचलपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दल तहसीलदार मदन जाधव, महसूल व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यात आणण्यात आली असून आगीच्या कारणाचा शोध सुरू आहे

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!