अमरावती – महेश बुंदे
भारतीय महाविद्यालय एन. सी. सी विभाग गर्ल्स युनिट तर्फे झुम्बा आणि फिटनेस कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ९ एप्रिल २०२३ रोजी कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी भारतीय महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. आराधना वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झुम्बा फिटनेस ट्रेनर मिस डॉली हरवानी यांनी प्रात्यक्षिकासह एनसीसी कॅडेट आणि उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
उद्घाटन प्रसंगी प्राचार्य आराधना वैद्य यांनी आधुनिक फिटनेसच्या नवनवीन प्रकारांची विद्यार्थिनींनी ओळख करून घ्यावी व आपले आरोग्य जपावे असे सांगत शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्व विशद केले. मिस डॉली हरवानी यांनी झुंबा हा प्रकार शारीरिक शरीराच्या आरोग्याबरोबर मन आनंदी व उत्साहीत ठेवण्यासाठी उत्कृष्ट व्यायाम प्रकार आहे तसेच आजच्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे,
