प्रतिनिधी आकाश वरघट
अमरावती वार्ता:- आयुष्यमान भारत अंतर्गत आझादी महोत्सव कार्यक्रम माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियंका निकोसे मॅडम व प्राथमिक आरोग्य केंद्र पळसखेड आरोग्य अधिकारी माननीय डॉ. मंगेश मानकर व डॉ.सुमित गजभिये त्यांच्या आदेशानुसार आरोग्यवर्धिनी केंद्र मालखेड येथे करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सरपंच मॅडम सौ लता ढोक व कार्यक्रमाचे उद्घाटक बचत गट अध्यक्ष श्रीमती सौ पद्मा थूल यांच्या हस्ते करण्यात आला.सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .या कार्यक्रमाचे संचालन श्री उमेश दिघाडे त्यांनी केले.या कार्यक्रमामध्ये श्री जयंतराव औंधकर आरोग्य सहाय्यक यांनी स्वच्छतेचे महत्व व आरोग्यवर्धिनी केंद्र येथे मिळणाऱ्या आरोग्यविषयक सोयी याबद्दल माहिती दिली.योगासने, व्यायाम व स्वच्छता चे महत्व सरपंच माननीय सौ लता ढोक, यांनी जनतेस पटवून दिले.जीवनाच्या अन्न ,पाणी व वस्त्र या मूलभूत गरजे बरोबर वैद्यकीय सेवा आजच्या काळाचा भाग बनत चाललेला आहे .असे यावेळी आरोग्य सेविका श्रीमती कोहते त्यांनी पटवून दिले तर आरोग्य सेवक श्री उमेश दिघाडे यांनी आरोग्य सुयोग्य ठेवण्यासाठी चांगला आहार व चांगल्या सवयी असणे आवश्यक आहे. याकरिता व्यसनमुक्त गाव,परिसर स्वच्छता ठेवणे अतिशय आवश्यक आहे हे पटवून सांगितले .

आजादी का अमृत महोत्सव चौथी वर्षगाठ आरोग्यवर्धिनी मालखेड येथे सकाळी परिसर स्वच्छता नंतर योगासने शिबिर श्रीमती भोयर मॅडम यांनी घेतले. योगासनाचे आरोग्य विषयक फायदे, समुपदेशन करण्यात आले. असंसर्गजन्य आजार व आरोग्यवर्धिनी केंद्र मालखेड येथे मिळणाऱ्या सर्व सोईसुविधा विषयी माहिती देण्यात आली .त्यानिमित्त कॅम्प आयोजित करण्यात आला.
यामध्ये उच्च रक्तदाब व शुगर तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाकरिता आरोग्यवर्धिनी केंद्र येथील समुदाय आरोग्य अधिकारी श्री निखिल कवडे ,आरोग्य सेविका प्रीती पवार ,यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाकरिता आरोग्य सहाय्यक श्री जेठे, आशा कार्यकर्ता सविता पाटील, यशोधरा पाटील ,निलेश दुधे सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ कलाने यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आरोग्य सेविका श्रीमती सुरेखा कोहाते त्यांनी केले.
अमरावती ग्रामीण प्रतिनिधी, आकाश वरघट