प्रतिनिधी फुलचंद भगत
मंगरूळपीर:-सदर यंत्रणा कार्यन्वीत करण्याचे मुळ उददीष्ट हे आहे की, पोलीस स्टेशनला /उपविभागीय पो.अ.कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आलेल्या तक्रारींची निर्गतीचे काम कमीत कमी वेळात विना विलंय पुर्ण होवन त्यातुन त्यांचे समाधान होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पोलीसांची जनमानसातील प्रतिमा उंचाविण्यास मदत होणार आहे. सदर यंत्रणेद्वारे पोलीस स्टेशन मध्ये विविध कामासाठी आलेल्या अभ्यागतांची सर्व माहिती या यंत्रणेद्वारे संकलीत होणार आहे.

सेवा हक्क कायदा २००५ च्या आदेशानुसार वाशीम जिल्हयाने नागरिकांना सेवा देण्यासाठी नागरिक केंद्री उपक्रम सुरु केला असुन त्यात हातातील टॅबलेटमध्ये तपशील टिपला जातो आणि नंतर केंद्रीकृत सेवा कक्षातील केंद्रीकृत सेवाकशाकडुन अभिप्राय घेतला जातो. ही प्रणाली प्रथम पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम येथे १७ डिसेंबर रोजी अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली म्हणुन सादर केली गेली ३ फेब्रुवारी पासुन सर्व १३ पोलीस स्थानकांना टॅबलेट पुरविण्यात आले.

मुलभुत कल्पना अशी आहे की अतिशय शुल्लक आणि छोटया मुदयांची दखल घेणे जे सहसा दुर्लक्षित राहिल्यास गंभीर गुन्याहयात रुपांतर होते व गुन्हे दाखल होतात. म्हणुनच प्रत्येक लहासहान समस्येची दखल घेणे आणि अभिप्राय गोळा करण्याची प्रणाली असणे आवश्यक आहे.
