राजगुरुनगर नगर न्यायालयात फुलझाडे व शोभेच्या झाडांच्या कुंड्या आणि खेड तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट देविदास युवराज शिंदे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय दिलीप आण्णा मोहिते पाटील, राजगुरुनगर वकील बार असोसिएशन चे अध्यक्ष देविदास शिंदे पाटील वकील उपस्थित होते. त्यावेळी खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय दिलीप आण्णा मोहिते पाटील यांनी सांगितले की परवानगी मिळाल्यास न्यायालयात सुविधा देऊ.

राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आवश्यक त्या सर्व सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. भरपूर निधी उपलब्ध आहे. मात्र कामे करण्यासाठी कोर्टाची परवानगी वकील बार असोसिएशन ने घेऊन द्यावी असे प्रतिपादन आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांनी केले. अध्यक्ष ऍड. देविदास युवराज शिंदेपाटिल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने न्यायालयाच्या परिसरात विविध झाडांच्या कुंड्या प्रदान कार्यक्रम खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
