दर्यापूर – महेश बुंदे
आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण आपल्या सवडीनुसार कोणता ना कोणता तरी छंद जोपासत असतो. माझा आवडता छंद आहे तो म्हणजे चित्र काढणं. हा छंद मला लहाणपणी पुस्तकातील चित्र पाहून लागला. मी ते चित्र पाहून वहीत काढत असे. लहानपणी मी पुस्तकातील मला आवडलेले एखादं चित्र काढत असे.
तेव्हाच मला चित्र काढायला खूप आवडत असे व ती सवय पुढे वाढत गेली. ही आवड मला लहानपणी लागली व ती आजही मी जपली आहे. एखादं चित्र मी पाहिल्यानंतर ते माझ्या मनात बसतं व ते हुबेहूब मी माझ्या हाताने पेपरवर रेखाटत असतो. ते जिवंत चित्र माझ्या डोळ्यांसमोर दिसतं तेव्हा मी ते पेपरवर चितारत असतो. आज मला चित्र काढण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणतात ना ‘आवड असल्यावर सवड मिळते’ तसं मी सवड काढून चित्र काढतो व आवड आपोआप निर्माण होते.
