महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी 131 प्रतीमेचे वितरण, सामाजीक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांचा पुढाकार

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशीम:सामाजीक कार्यात अग्रेसर असलेले तरुण क्रांती मंच, अ.भा. भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा आर्ट ऑफ लिविींगचे जिल्हा सल्लागार, सामाजीक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांनी भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती दिनानिमित्त आंबेडकरी चळवळीत कार्य करणार्‍या विविध क्षेत्रातील 131 प्रतिभावंतांना महामानवाची प्रतिमा भेट देवून त्यांचा भावपूर्ण सत्कार केला. सोमाणी यांनी या निमित्ताने जयंतीदिनी नवीन आदर्श पायंड रचला असून, त्यामुळे आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ट असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सामाजीक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांच्या हस्ते न्यायाधिश वाघमारे, शहर वाहतूक शाखेचे नागेश मोहोड, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सामाजीक कार्यकर्त्या श्रीमती वैशालीताई खोब्रागडे,सुप्रसिध्द ह्रद्‌यरोग तज्ञ डॉ. सिध्दार्थ देवळे, डॉ. वैशाली देवळे, जेष्ठ आंबेडकरी विचारवंत रामप्रभु सोनोने, सौ. प्रतिभाताई सोनुने, माणिकराव सोनुने, सामाजीक कार्यकर्त्या सौ. संगिताताई इंगोले, वसंतराव इंगोले, जेष्ठ विचारवंत गोपाळराव आटोटे गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष पवन राऊत, जेष्ठ मार्गदर्शक मधुकरराव जुमडे, 2000 संविधानाचे वितरण करुन महामानवांचे विचार घराघरात पोहचविणारे परमेश्‍वर अंभोरे, जेष्ठ साहीत्यीक महेंद्र ताजणे, रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे, पत्रकारीतेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुताचे मुल्य समाजामध्ये रुजविण्यासाठी काम करणारे सुनिल कांबळे, विनोद तायडे, संदीप डोंगरे, पप्पु घुगे, संजय खडसे, समाजसेवक दौलतराव हिवराळे, कलावंत शेषराव मेश्राम,पं.स. सभापती रेश्माताई गायकवाड, शाहीर धम्मानंद इंगोले,

महामानवाच्या जयंतीदिनी 3131 लाडू, केळी व थंडपेयाचे वितरण करणार्‍या राजरत्न अत्पसंख्याक संस्था, भारत व्होकेशनल कॉलेज व मुकनायक विचार मंच पदाधिकार्‍यांचाही यावेळी महामानवाची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला. समवेत समाजामध्ये आंबेडकरी चळवळीसाठी धडपडणार्‍या विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना महामानवाच्या प्रतिमेचे वितरण करण्यात आले. यावेळी निलेश सोमाणी यांनी समाजामध्ये समता, स्वातंत्र्य व बंधुताची शिकवण देणार्‍या महामानवाच्या विचाराची खरी गरज असल्याचे प्रतिपादन केले.

क्रांतीकारी राष्ट्रसंत तरुण सागरजी महाराज व त्यांचे एकमात्र शिष्य लघुमुनी पर्वसागरजी महाराज यांनी सुध्दा आपल्या विचारातून समतेचा संदेश संपूर्ण जगाला दिलेला आहे. त्यांच्यापासून प्ररेणा घेवून असे विविध सामाजीक उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी सोमाणी यांनी बोलून दाखविला. सदर उपक्रमाची सर्वत्र प्रशंशा होत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!