चाकण:- सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती राज्यभरात साजरी होतेय.
म्हणून त्या निमित्ताने निर्मिका फाऊंडेशन प्रस्तुत व स्वराज्य वार्ता मीडिया पाटनर घेऊन येत आहे विनामूल्य ऑनलाइन रांगोळी स्पर्धा यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो सर्वांनी आपल्या घरात किंवा घरच्या घरीच परिसरात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र किंवा त्यांच्या जीवणावर आधारित लेख, घडलेले प्रसंग ,भीम जयंतीच्या शुभेच्छा देणारे कोणत्याही प्रकारची एक रांगोळी मध्ये काढून त्या रांगोळी चे सुंदर असे फोटो काढून 9822222707(स्वराज्य वार्ता) ह्या whatsapp क्रमांकावर पाठवून दया व सहभागी होणाऱ्यानी आपले संपूर्ण,नाव ,पत्ता मोबाईल क्रमांक, पाठवून दया स्पर्धकांचे नाव बक्षीस वितरण पुढील सूचनेनुसार जाहीर केले जाईल.
गेल्या दोन वर्षात जगभरात करोना व्हायरसने उच्छाद मांडला आहे. या भयंकर विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनसारख्या परिस्थितीमुळे सगळ्यात सण-उत्सवांवर विरजण पडले होते. गेल्या दोन वर्षात १४ एप्रिल अर्थात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरच्या घरीच साजरी करण्यात आली होती. दरवर्षी धुमधडाक्यात सार्वजनिक रित्या साजऱ्या होणाऱ्या या वार्षिक आनंदोत्सवावर करोनाचं सावट आलं होतं. मात्र या वर्षी करोनाचं संकट ओसरलं असल्यानं तब्बल दोन वर्षानंतर यंदाची भीम जयंती पहिल्यासारखीच धुमधडाक्यात साजरी करण्यात येणार आहे. असं असलं तरीही करोनाला रोखण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करून यंदाची भीम जयंती सुरक्षितपणे साजरी करूया

डॉ. आंबेडकरांचे प्रेरणादायी वाक्य, छायाचित्रे, प्रसंग तुमच्या जवळचे नातेवाईक, मित्रपरिवारमधील लोकांना सांगा व आम्हाला पाठवून यंदाच्या भीम जयंतीचा आनंद आणखी द्विगुणीत करा.


