विशेष प्रतिनिधी बापूसाहेब सोनवणे
पुणे वार्ता:- दिनांक १२/०४/२०२२ रोजी मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत गोपनिय माहिती मिळाली की एक आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक एमएच ०३ सिव्ही ९१६३ हिचेमध्ये बैल, वासर तसेच गायींचे कत्तल केलेल्या मासाची साठवणुक करुन त्याची बेकायदेशीर विक्रीसाठी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश यांनी मिळालेल्या गोपनिय माहितीची खात्री करून कार्यवाही करणे बाबत सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्री. देवेंद्र चव्हाण यांना मार्गदर्शन करुन योग्य त्या सुचना दिल्या होत्या.
सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. देवेंद्र चव्हाण यांनी त्यांचे,अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची टिम तयार करुन गोमांसाची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर दिनांक १२/०४/२०२२ रोजी रात्री २२:१५ वाजता चे सुमारास रावेत पोलीस चौकीच्या हद्दीत किवळे ता. मुळशी जि. पुणे येथील बेंगलोर-मुंबई हायवे रोड लगत असलेल्या गणेश वडेवाले यांचे समोरील सर्व्हिस रोडवर नाकाबंदी लावुन सापळा रचुन एक आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक एमएच ०३ सिव्ही ९१६३ यामध्ये बैल, वासरु तसेच गायींचे कत्तल केलेल्या मासांची साठवणुक करुन त्याची बेकायदेशीर विक्रीसाठी वाहतुक करणाऱ्या इसमांवर छापा टाकला असता आरोपीच्या ताब्यात मिळुन आलेल्या मुद्देमालाचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.
१) १०,००,०००/- रुकिंचा एमएच ०३ सिव्ही ९१६३ क्रमांकाचा आयशर कंपनीचा टेम्पो, २) ३,००,००० /-रुकिं. चे अंदाजे १५०० किलो वजनाचे गाय व बैलांचे कत्तल केलेले मांस प्रत्येकी २०० रु किलो प्रमाणे,असा एकुण १३,००,०००/- रुकिंचा मुद्देमाल मिळुन आला आहे.
यात आरोपी १) नागनाथ चणप्पा नागेशी वय ३८ वर्षे रा. रमाईनगर झोपडपट्टी, रावेत पुणे मुळपत्ता मु. पो. वळसंग ता. दक्षिण सोलापुर जि. सोलापुर पाहिजे आरोपी २) मेहबुब अब्दुल कुरेशी वय ४० वर्षे रा कसाई गल्ली, फलटण चौक, बारामती जि. पुणे. पाहिजे आरोपी ३) साजीद फरीद कुरेशी यांचे विरुद्ध रावेत पोलीस चौकी येथे गुरनं २२१ / २०२२ महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम कलम ५.५ (सी) ९९ (अ) ९ (बी) ११ सह भा.दं.वि. कलम ४२९.३४ मो.वा.का. कलम ६६ ( १ ) / १९२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी क्र.१ याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास रावेत पोलीस चौकी करीत आहे.

तसेच मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. डॉ. प्रशांत अमृतकर यांना त्याचे गुप्त बातमीदागार्फत गोपनिय माहिती मिळाली की, महाळुंगे (ई) पोलीस चौकीच्या हद्दीत मु.पो. खालुंब्रे ता.खेड जि.पुणे येथे TOP BAND कंपनीच्या शेजारी मोकळ्या जागेत इसम नामे स्वप्नील शिवेकर हा स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने जमीनीवर उत्खनन करुन मुरुमाची चोरी करुन त्याची विक्री करीत आहे.

अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरून मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त श्री. डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. डॉ. काकासाहेब डोळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे श्री डॉ. प्रशांत अमृतकर, मा सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे श्री गद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख
पोलीस निरीक्षक श्री देवेंद्र चव्हाण यांनी त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची टिम तयार करून दोन-तीन दिवसापासुन ट्रॅप लावला असता माहिती मिळाली की रात्री दरम्यान अवैधरित्या जमीनीवर उत्खनन करून विक्री करीता जेसीबीच्या सहाय्याने मुरुमाची चोरी केली जात आहे.

अशा मिळालेल्या माहितीवरुन दिनांक १३/०४/२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी महाळुंगे (ई) पोलीस चौकीच्या हद्दीत रात्री ०२:१० वा चे सुमारास सापळा रचुन छापा टाकला असता तीन इसम मरुम चोरी करताना मिळुन आले त्यांचे ताब्यात मिळुन आलेल्या मुद्देमालाचे वर्णन खालीलप्रमाणे आहे..

१) १६.५२,०००/- रुकिंचा एक निळया पांढ-या रंगाचा टाटा कंपनीचा एमएच ४६ एआर ४८७६ क्रमांकाचा दहाचाकी हायवा. त्यामध्ये अंदाजे ०२ बास मुरुम किंमत अंदाजे २,०००/- रुकिंचा. २) १४,००,०००/- रुकिं. एक पिवळ्या रंगाचा एमएच ४२ ए ९५२३ क्रमांकाचा चारचाकी जेसीबी असा एकुण ३०,५२,०००/- रु किं चा मुद्देमाल मिळुन आला आहे.
