राजगुरूनगर वार्ता-: खेड बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अँड नवनाथ गावडे, उपाध्यक्षपदी अँड संतोष दाते व अँड ललित नवले, तर सचिवपदी अँड गोपाळ शिंदे व अँड रेश्मा भोर यांची निवड झाली आहे. ही निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
खेड बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अँड नवनाथ गावडे यांची प्रचंड बहुमताने निवड झाली. या निवडणुकीत ४१५ पैकी ३९५ मतदारांनी मतदान केले. अँड अरुण मुळूक व अँड बाळकृष्ण सांडभोर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले.
