प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा न्यायालय वाशिम येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीज्ञ संघ वाशीम यांच्या संयुक्त वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन आज ७ एप्रिल रोजी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा श्रीमती शैलजा सावंत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विजय काळबांडे व वाशीम येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ सिद्धार्थ देवळे,जिल्हा विधीज्ञ संघाच्या अध्यक्षा एड. श्रीमती छाया मवाळ तसेच न्यायिक अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
