वाशीम | बनावट क्रीडा प्रमाणपत्र समर्पणाचे आवाहन

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम : खेळाडूना शासकीय निमशासकीय सेवेत ५ टक्के आरक्षण ठेवले आहे. बनावट प्रमाणपत्रधारकाचे क्रीडा विभागाकडून क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी केलेली आहे. काही उमेदवारांनी शासकीय सेवेचा लाभ घेतला आहे. अशा उमेदवारांना भविष्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी एक संधी म्हणून बनावट क्रीडा प्रमाणपत्र व बनावट क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजनेचेबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

ज्या उमेदवारांनी क्रीडा संचालनालय व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांचेकडून बनावट क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी करुन घेतली असेल, अशा उमेदवारांना तसेच त्या आधारे शासकीय, निमशासकीय व इतर कार्यालयामध्ये नोकरी धारण केली आहे. अशा उमेदवारांनी मुळ क्रीडा प्रमाणपत्र व मुळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट राज्य पुणे यांचेकडे व्यक्तीशः अथवा पत्राव्दारे ३१ मे २०२२ पुर्वी समर्पित करण्यात यावा. अशा उमेदवारांची नांवे गोपनीय ठेवण्यात येतील.

मुदतीत बनावट क्रीडा प्रमाणपत्रे मुळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जमा न केल्यास संबंधीत उमेदवार व संबंधीत क्रीडा संघटना यांचेविरुध्द फौजदारी कारवाई करण्यात येईल. बनावट क्रीडा प्रमाणपत्रधारक उमेदवारांनी ३१ मे २०२२ पर्यंत आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे येथे आपला अहवाल सादर करावा. असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण विभागाचे आयुक्त श्री. ओमप्रकाश बकेरिया यांनी केले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!