वाशीम | ट्रॅव्हल-टँकरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ३ ठार, ८ जखमी

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-शहरालगत अकोला नाका परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला. पुण्यावरून यवतमाळ जाणाऱ्या खासगी बस आणि पाण्याच्या टँकरची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भयंकर होता टँकरमधील चालक आणि क्लीनर जागीच ठार झाले. टँकरमधील एक गंभीर जखमी आहे.खासगी बसमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. बसमधील ७ जण जखमी झाले. दरम्यान जखमींना वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात येणार आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!