पुणे वार्ता :- उंड्री : पिरंगूट येथून हडपसरकडे लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या बसने भूगाव (ता. मुळशी) येथे अचानक पेट घेतला. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील सर्व वऱ्हाडी सुखरूप आहेत.
कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
गाडी भुगाव येथे आल्यानंतर अचानक गाडीच्या रेडिएटर जवळून धूर निघत होता. चालकाच्या लक्षात येताच त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवून बसमधील वऱ्हाडी मंडळींना बाहेर निघण्यास सांगितले. सर्व प्रवासी उतरताच गाडीने पेट घेतला. या घटनेत मिनीबस पूर्ण जळून खाक झाली. दुर्घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी पुणे पालिकेच्या दोन आणि फॉरेस्ट ट्रेल्स येथील एक अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. तिन्ही गाड्यांनी आग आटोक्यात आणली. चालकाच्या सतर्कतेने जीवीत हानी टळल्याने चालकाचे कौतुक होत आहे.