अमरावती प्रतिनिधी ,आकाश वरघट :-
, टोंगलाबाद येथील शेतकरी, दिपक राव विश्वनाथ भंगे, यांच्या चार एकर सोयाबीन चा गंजीला रात्री दहा वाजता पेट्रोल टाकून आग लावलेली गेली.
तेथून लगेच 10, मिनिटांनी बाजूचा शेता मदे रामू पंढरीनाथ मारोटकर यांच्या तीन एकर सोयाबीन च्या गंजीला आग लागलेली होती, आणि त्यांच्या बाजूचे शेतकरी ,रवींद्र सुभाषराव भंगे, यांनी 13 एकर सोयाबीन ची गंजी त्यांच्या शेतामध्ये लावलेली होती, यांच्या १३ एकर शेतीचा सोयाबीनला दहा वाजून वीस मिनिटांनी आग लागलेली दिसली, गावातील लोकांनी आवाज केले,आग लागली सेता मदे .तर रवींद्र भंगे यांनी सेता मदे धाव घेतली, तसेच गावातील नागरिक कानी शेताकडे धाव घेतली शेतामधले सर्व जणांचे गणजा पूर्णपणे पेटलेल्या दिसल्या, या सर्व शेतकऱ्यांनी करायचे काय, जे काय नुकसान झाले, याच्याकडे काहीतरी शासनाने लक्ष द्यावे, आता आम्ही करायचे काय असे प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहे .
जे काही पिक होते ते नष्ट झाले पूर्ण पणे, गावातील नागरिक हेमंत बावनकुळे, व हरीश चौधरी, आशिष चौधरी, महेश सात पैसे, व इतर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन घटनेचा पुढील तपास करत आहे.