दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर येथील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेली गुरुकुल बीएस्सी नर्सिंग महाविद्यालय व ए .एन. एम ./ जी .एन. एम. यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे सर्व विद्यार्थी वर्ग यांनी हा दिवस साजरा केला, आरोग्यामध्ये केवळ शारिरिक रित्या नाही तर मानसिक रित्या ही तंदुरुस्त असणे गरजेचे आहे, एखादी व्यक्ती जर शारीरिक व मानसिक दृष्ट्या फिट असेल तर त्या व्यक्तीला निरोगी म्हटलं जातं, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार आरोग्य हे मानवी आनंद आणि कल्याणासाठी मूलभूत आहे तसेच मानवाच्या प्रगतीसाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान असते, निरोगी व्यक्ती अधिक काळ आयुष्य आनंदात जगू शकतो, उत्तम जीवन जगण्यासाठी जीवन जगण्याची शैली हे आपण बदलली पाहिजे असे जाणकार व्यक्त करतात, निरोगी आरोग्य ही जीवनाची गुरुकिल्ली प्रमाणे असून डब्ल्यू एच ओ च्या माध्यमातून सात एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.
