धुळे येथील वैफल्यग्रस्त युवकास राजगुरुनगरमधुन वडीलांच्या ताब्यात ; खेड पोलिस स्टेशन व सुशृत हॉस्पीटलची सामाजिक बांधिलकी ..

राजगुरुनगर – धुळे जिल्ह्यातील साक्रि तालुक्यातील लोणखेडे येथील १० दिवसांपासुन बेपत्ता असलेला वैफल्यग्रस्त किरण सतिश चव्हाण हा युवक पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील टाकळकरवाडीत आढळुन आला होता. खेड पोलिस स्टेशन व सुशृत हॉस्पीटल डॉ.दिलिप बांबळे डॉ.प्रमिला बांबळे यांनी माणुसकीच्या भावनेतुन या युवकास दोन दिवस सांभाळुन आज त्या युवकास त्याचे वडील सतिश दंगल चव्हान यांच्या ताब्यात देण्यात आले.

राजगुरुनगर जवळील टाकळकरवाडी मध्ये अनेकांच्या घरात एक युवक घुसुन हे घर माझे आहे असे म्हणायचा लोक त्याला घाबरुन हाकलुन देत होते. तेथील सामाजिक कार्यकर्ते पराग टाकळकर व साई टाकळकर यांनी त्या युवकास खेड पोलिस स्टेशनच्या ताब्यात स्वाधीन केले.

खेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सतिश गुरव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस एम.ए.पंचरास व पोलिस रमेश करंडे यांनी त्या युवकाकडे सखोल चौकशी केली असता त्याने निघोजे गाव येथे संतोष शिंदे यांच्या चाळीत त्याचा भाऊ गणेश सतिश चव्हान भाड्याने राहत असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस रमेश करंडे यांनी हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते कैलास दुधाळे व होमगार्ड चेतन चव्हान यांना सोबत घेऊन पोलिस व्हॅनमधुन निघोजे येथे संतोष शिंदे यांच्या चाळीत वैफल्यग्रस्त युवकास रात्री ८:३० वाजता घेऊन गेले व त्या ठिकाणी गणेश सतिश चव्हाण राहत नसल्याचे आढळुन आले त्यानंतर हा युवक उडवा उडवाची उत्तरे देऊ लागल्याने पोलीस अधिकारी हतबल झाले.

शेवटी त्या युवकास कुठेही न सोडता परत राजगुरुनगरला घेऊन आल्यानंतर डॉ.दिलिप बांबळे व डॉ.प्रमिला बांबळे यांच्या सुशृत हॉस्पीटलमधे ठेवण्याची व्यवस्था बांबळे यांनी केली.त्या वैफल्यग्रस्त युवकाजवळील लिहिलेल्या कागदावरील नंबरवर फोन लावला असता त्याचे भाऊ गणेश सतिश चव्हाण यांच्याशी बोलने झाल्याने त्त्यांचे वडील सतिश दंगल चव्हाण धुळे येथुन तात्काळ त्या युवकास घेन्यासाठी आले.

बांबळे हॉस्पीटलमधे त्या मुलाला भेटल्यावर वडीलांचे अश्रू अनावर झाले होते. तो युवक गेली १० दिवसांपासुन बेपत्ता असल्याचे वडीलांनी सांगितले. तो वैफल्यग्रस्त युवक अधुन मधुन असा कुठेही भटकत असतो तो एवढ्या लांब कसा आला हे मात्र कसेच समजु शकले नाही.

त्या युवकाच्या वडीलांकडे धुळे येथे परत जाण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने सामाजिक कार्यकर्ते माणिकशेठ होरे व दिनेशशेठ सांडभोर यांनी १००० रुपये तसेच खेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सतिश गुरव साहेब यांनी १००० रुपये असे एकुन २००० रुपये त्या युवकाच्या वडीलांकडे दिले व खर्या अर्थाने माणुसकी जपण्यात आली. यावेळी खेड पोलिस स्टेशनचे निरिक्षक सतिश गुरव साहेब ए.पी.आय राहुल लाड महिला पोलिस एम. ए .पंचरास मॅडम पोलीस रमेश करंडे,रमेश दाते,संदीप भापकर होमगार्ड चेतन चव्हाण सामाजिक कार्यकर्ते कैलास दुधाळे,मच्छिंद्र पवळे, माणिक होरे, प्रविन गायकवाड कैलास मुसळे आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!