१९८ जणांची नेत्रतपासणी करुन ५० जणांची उदगिर येथे मोफत नेत्रशस्त्रक्रिया
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम – लॉ. वसंतराव धाडवे यांनी तळागाळातील रंजल्यागांजल्यामध्ये देव पाहून त्यांना नेहमी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे त्यांचे सेवाकार्य हे सेवायज्ञातील समिधेप्रमाणे आहे असे आर्शिवादपर मनोगत रतनगडचे गोपालबाबा यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
स्थानिक आयुडीपी येथील सावित्रीबाई फुले नर्सिग कॉलेजच्या प्रांगणात जेष्ठ समाजसेवी लॉ. वसंतराव धाडवे यांचा ६६ व्या वाढदिवसानिमित्त २ एप्रिल रोजी विविध सेवाभावी व सामाजीक उपक्रम घेण्यात आले. यानिमित्त आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे माजी आमदार तथा राज्यमंत्री श्रीकांत देशपांडे हे होते तर उद्घाटक म्हणून रतनगड येथील गोपाल महाराज यांची उपस्थिती होती.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा शिपींग कार्पोरेशनचे संचालक विजयराव जाधव, व्यसनमुक्ती सम्राट तथा गोरक्षण संस्था लाठीचे दिलीपबाबा, माजी जि.प. सदस्य तथा माजी सहकारी बँक संचालक राजुभाऊ चौधरी, जेष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे, प्रा. दिलीप जोशी, डॉ. नानवटे, इंजि. धुमाळे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी अध्यक्ष, उद्घाटक व प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहूण्यांचा लॉ. धाडवे मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, गरीब महिलांना साड्या व शिलाई मशीन वाटप, दिव्यांगांना काठी व सायकलचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे डॉ. गायकवाड व त्यांच्या टिमच्या वतीने शिबीरात सहभागी १९८ व्यक्तींची नेेत्रतपासणी करण्यात आली व त्यात पात्र एकूण ४८ रुग्णांना मोफत मोतीबिंदु नेत्रशस्त्रक्रियेसाठी उदगिर येथे लक्झरी बसने पाठविण्यात आले. यांचा शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च लॉ. वसंतराव धाडवे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.
