विशेष प्रतिनिधी बापूसाहेब सोनवणे
सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने स्पामध्ये स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करवुन घेणा-यांवर कारवाई केलेबाबत मिळालेल्या माहितीनुसार”
पुणे वार्ता- मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक ०१/०४/२०२२ रोजी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या मुलींकडुन वेश्याव्यवसाय करुन घेणा-यांवर कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक ०१/०४/२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत वाकड पोलीस स्टेशन हद्दीत Castle Spa & Wellness Centre, शॉप नं १७/५/१ साई सागर प्लाझा, आँध रावेत बीआरटी रोड, साई चौक, जगताप डेअरी पिंपळे सौदागर, पुणे येथे स्पाचे नावाखाली मुलींकडुन पैश्याचे आमिष दाखवुन वेश्या व्यवसाय करवून घेतला जात आहे अशी माहिती मिळाली होती .
अशा मिळालेल्या माहितीवरून बनावट ग्राहक पाचारण करुन पडताळणी करीता शॉप नं १७/५/१ साई सागर प्लाझा, आंध रावेत बीआरटी रोड, साई चौक, जगताप डेअरी पिंपळे सौदागर, पुणे येथील नावाचे Castle Spa & Wellness Centre मध्ये पाठवुन सापळा रचुन छापा टाकुन आरोपींचे ताब्यातून एकुण ०४ पिडीत मुलींची (२ पश्चिम बंगाल, २ महाराष्ट्रीयन) वेश्याव्यवसायातून सुखरुप सुटका करण्यात आलेली आहे.
घटनास्थळावरून जप्त केलेल्या मुद्देमालाचे वर्णन खालील प्रमाणे आहे.