श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर देऊळगावांमध्ये संपन्न

बातमी संकलन – महेश बुंदे

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, द्वारा संलग्नित श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोट जिल्हा अकोला यांच्या वतीने दि. २५ ते १ एप्रिल या कालावधीत आकोट तालुक्यातील देऊळगाव या गावी सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शीबिर संपन्न झाले. या शिबिरात सुमारे १५० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप दि. १ एप्रिल रोजी संपन्न झाला.

या समारोप समारंभासाठी अध्यक्ष म्हणून केशवराव मेतकर कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती केशवराव गावंडे कार्यकारणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, डॉ. राजेश बुरंगे संचालन राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, डॉ. सुनील पांडे प्राचार्य श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोट, डॉ. प्रशांत कोठे प्राचार्य जिजामाता महाविद्यालय, बुलढाणा, देऊळगाव गावचे सरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आदी विचारपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबा व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरांतर्गत गावातील सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण, स्वच्छ भारत स्वस्थ भारत, बळीराजा चेतना अभियान, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्व निर्माण करणे, श्रमदानातून बंधारा आणि १५ शेततळे यासारखे तसेच सायंकाळी विविध प्रकारचे सामजिक जनजागृती सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारिणी सदस्य केशवराव मेतकर म्हणाले की, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाने केलेले कार्य उल्लेखनीय असून सामाजिक बांधिलकी जोपासत सातत्याने काम करत आहे, विद्यार्थ्यांच्या शिस्तप्रियतेतून दिसून येते असे प्रतिपादन केले. या प्रसंगी रासेयो स्वयंसेवकांनी मनोगत व्यक्त केले.

या शिबिराचे सर्व नियोजन रासेयो जिल्हा समन्वयक डॉक्टर येऊन कार्यक्रम अधिकारी डॉ. गजानन तायडे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. स्नेहल रोडगे, प्रा. प्रतिभा पवित्रकार, यांनी प्राचार्य डॉ. सुनील पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. समारोप सभारंभाचे प्रास्तविक रा.से.यो. संचालक डॉ. राजेश बुरंगे यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय, डॉ. गजानन तायडे, सूत्रसंचालन डॉ. स्नेहल रोडगे तर या शिबीरातील उल्लेखनीय कार्य पहाता याची नोंद घेत राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक व विभाग समन्वयक आर. एल. येऊल यांनी आभार प्रदर्शन करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

प्रतिक्रिया –

“गावांमध्ये शिबिरामार्फत शासकीय योजनांची माहिती गावापर्यंत पोहचवणे व त्यांची समस्या दूर करण्याची जबाबदारी ती आपल्या विद्यापीठाची आहे. विद्यापीठाचे म्हटल म्हणजे एकटे कुलगुरूंची नसून कुलगुरूंचे हात म्हणजे आपण आहेत असे रा.से.यो. स्वयंसेवकांना त्यांनी म्हटले, आपल्या मार्फत गावकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, शिकलेला किंवा शिकणारा विद्यार्थी खेड्यामध्ये राहावा तिथे राहून त्यांच्या समस्या समजून घ्याव्या, माझ्या प्रत्येक महाविद्यालयात शिकत असलेला विद्यार्थी हा तेवढा सक्षम आहे, फक्त त्या विद्यार्थ्यांनी आपली ताकद, बुद्धी व सक्षमता यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या समस्येवर विचार केला पाहिजे”

डॉ. दिलीप मालखेडे (कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती)

“महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनात व्यक्तिमत्व विकास जडणघडणीसाठी राष्ट्रीय सेवा योजना स्तुत्य उपक्रम आहे, श्रमसंस्कार व पर्यावरण संवर्धन हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक समजला जातो त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी समाजाच्या गरजा व समस्या ओळखून त्या समस्या सोडवण्यासाठी सतत कार्यरत राहावे”

डॉ. राजेश बुरंगे
(संचालक रा.से.यो. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती)

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!