दर्यापूर – महेश बुंदे
कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागल्याने दर्यापूर येथील स्व. संजय जळमकर यांचे स्मृती प्रित्यर्थ ऋषिकेश संजय जळमकर यांनी माहेश्वरी भवन अकोट रोड येथे सामाजिक बांधिलकीच्या नात्याने पाणपोई सुरू केली आहे. याचे उद्घाटन अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या हस्ते झाले.
