अमरावती | फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याचा पेपर हिसकावला, विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या ; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- कुळकर्णी

अमरावती: विद्यार्थ्याने महाविद्यालयाची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याचा पेपर हिसकावल्याने अनिकेत निरगुडवार या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार माजी मंत्री वसुधा देशमुख यांच्या अमरावती मधील वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी महाविद्यालयात घडला आहे.

तर, आपल्या मुलाने शाळेच्या फी चे पैसे भरले नाही म्हणून त्याचा पेपर हिसकाल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या पालकांनी केला आहे. या घटनेमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी महाविद्यालया विरोधात बडनेरा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

आत्महत्या करणारा विद्यार्थी हा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून तो वसुधा देशमुख यांच्या महाविद्यालयात बी. टेक. (B.Tech) च्या अंतिम वर्षांचे शिक्षण घेत होता.दरम्यान, विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरनी महाविद्यालय प्रशासनावर कारवाई करावी ही मागणी भाजपचे शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे. तर बडनेरा पोलीस भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी पोलीस ठाण्यात आंदोलन सुरू केले आहे.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात बी. टेकच्या तृतीय वर्षाची थोडी फी शिल्लक होती म्हणून विद्यार्थ्याला प्रॅक्टिकल परीक्षेला बसू न देण्याच्या महाविद्यालयाच्या कृत्यामुळे अनिकेत अशोक निरगुडवार या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी ही अमानवीय घटना असून या प्रकरणी महाविद्यालया विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

अनिकेत अशोक निर्गुडवार हा विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील आहे. त्याने बहुतांश शिक्षण शुल्क भरले होते. थोडेसे बाकी होते. शिक्षण शुल्कासाठी त्याच्या कुटुंबीयांना सूचित न करता, काल प्रॅक्टिकल परीक्षेच्या वेळी त्याला हाकलून देण्यात आले. शैक्षणिक संस्था इतकी निर्दयीपणे वागू शकते, याचे दुसरे उदाहरण असू शकत नाही. संवेदनशील अनिकेतने अखेर मृत्यूला कवटाळले. आज अनिकेतचे वडील अशोक निर्गुडवार आणि त्यांचे कुटुंबीय बडनेरा पोलीस ठाण्यात पोहचले असता, शिवराय कुळकर्णी यांनी त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!