भारतीय महाविद्यालयाचे रासेयो श्रमसंस्कार निवासी शिबिर संपन्न

अमरावती प्रतिनिधी – महेश बुंदे

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती संलग्नित भारतीय महाविद्यालय अमरावती येथील राष्ट्रीय सेवा योजना द्वारा निवासी शिबिर दि.19 -26 मार्च 2022 ला आयोजीत करण्यात होत. या शिबिराचा समारोप कार्यक्रम दि. 26 मार्च 2022 रोजी संपन्न झाला.


या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रमेश बिजवे,अध्यक्ष भारतीय विद्या मंदिर,अमरावती,प्रमुख अतिथी आनंदराव सोमवंशी उपाध्यक्ष भारतीय विद्या मंदिर अमरावती,
प्रमुख उपस्थिती अरुण भगत,सरपंच, सेलूगुंड ग्रामपंचायत, मनोज किचमबरे,मुख्याध्यापक प्राथमिक शाळा हिंगलासपूर, डॉ.प्रशांत विघे कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना,डॉ स्नेहा जोशी महिला कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना,डॉ.पल्लवी सिंग,डॉ. सुमेध वरघट,,डॉ. भार्गवी चिंचमलातपुरे ,डॉ. मीना डोईबोले विचारपीठावर उपस्थित होते.


सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते गाडगे बाबा व सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. सुमित वरघट यांनी करून दिला.या शिबिरांतर्गत गावातील सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण ,गाडगे बाबाच्या दशसूत्रीची प्रासंगिकता,आदिवासी जनजागृती, महिला बालकल्याण व महिला सबलीकरण, कायदे विषयक मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, मतदार जनजागृती, स्वातंत्र्य महोत्सवी वर्ष व देशातील वास्तव , राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची भूमिका, माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत वृक्ष लागवड, कोविड जनजागृती अभियान व सर्वेक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण जनजागृती, स्वयंरोजगार मार्गदर्शन, ग्रामस्वच्छता अभियान, आरोग्यविषयक मार्गदर्शन, हींगलासपूर येथील हिंगलाज देवीच्या मंदिराची व परकोटाची रंगरंगोटी यासारखे तसेच सायंकाळी विविध प्रकारचे सामजिक जनजागृती सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .

विशेषत्वाने यामध्ये जलसंवर्धन अंतर्गत बंधारा बांधणे स्वयंसेवकांच्या वतीने पाणी अडवा-पाणी जिरवा या संकल्पने अंतर्गत मोठ्या स्वरूपात श्रमदानाचे करण्यात आले आहे. या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.रमेश बीजवे म्हणाले की, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाने केलेले कार्य उल्लेखनीय असून सामाजिक बांधिलकी जोपासत सातत्याने काम करत आहे, विद्यार्थ्यांच्या शिस्तप्रियतेतून दिसून येते असे प्रतिपादन केले.


पुढे प्रमुख अतिथी श्री. अनंतराव सोमवंशी म्हणाले की, भारतीय महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य विद्यापीठास्तरावर उल्लेखनीय सातत्याने सुरू आहे. त्यासाठी महाविद्यालयातील स्वयमसेवक किती मोठं काम करू शकते हे हिंगलास पूर गावाच्या श्रमदान शिबिरातून दिसून येत आहे. महाविद्यालयातील राष्ट्रीय पथक महाविद्यालयची प्रतिमा उंचावण्याचा सातत्याने प्रयत्न करते आहे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, मुख्याध्यापक ,ग्रामसेवक, रासेयो स्वयंसेवकांनी मनोगत व्यक्त केले.


या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक विनोदराव भगत, राजूभाऊ भगत, नागेश लाहे, गजानन भगत, पंकज भगत, राधेशाम वानखडे, विलास भगत, बाळू नेवारे आधी मंडळी , ग्रामसेक दिनकरराव आंधळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक सहभागी झाले होते, त्याच प्रमाणे महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. काजल वैद्य, आभार कु. आकांक्षा बुटले यांनी मानले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!