सणसवाडी दि. १ ( वा ) श्री क्षेत्र वढु बु ॥ येथील धर्मविर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीवर शासकीय इतमामात हेली कॅप्टरमधून पुष्पवृष्टी करत आणी गृह मंत्रालयाच्या वतीने पोलिसांनी सलामी देत 333 वा बलिदान स्मरण दिन साजरा करणेत आला. धर्मविर संभाजी महाराज स्मृती समिती ,धर्मविर युवा मंच व समस्त ग्रामस्त वढु बु ॥ आयोजीत या सोहळ्यात मुकपदयात्रेनंतर हभप बाजीराव महाराज बांगर यांचे धर्माच्या रक्षणार्थ देशासाठी बलीदान देणाऱ्या शंभू चरीत्रावर कीर्तन झाले . यांनंतर स्मृती स्थळावर शासनातर्फे हेलीकॅप्टर मधून पुष्प वृष्ठी करणेत आली व पोलीसांतर्फे सलामी देत मानवंदना देण्यात आली . गायत्री फरताळे या मुलीने शंभुवंदना सादर केली .
प्रस्तावनेत सोमनाथ भंडारे यांनी मान्यवरांचे स्वागत करून वढुला विकास कामासाठी शासनाकडून मिळणाऱ्या मदत कार्यासाठी नेत्यांचे आभार मानले .मा .सरपंच अंकुश शिवले यांनी पर्यटन विकासासाठी पुढेही अनुदानाची अपेक्षा व्यक्त केली .यावेळी ग्रामस्थांचे हस्ते थोर विचारवंत पुष्पे द्रजी कुलश्रेष्ठ ,खासदार अमोल कोल्हे, आ. अशोक पवार, पंडीत दरेकर व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी सिने निर्माते प्रविण तरडे, संदिप मोहिते, ता. रा . कॉ . अध्यक्ष रवि काळे, जि.प . सदस्या सविता बगाटे, पीडीसी च्या वर्षां शिवले, राजेंद्र नरवडे, सरपंच ,उपसरपंच व महाराष्ट्रातील अनेक भागातून आलेले शंभु भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते . नवी दिल्ली येथून खास सत्कार मुर्ती पुष्पेंद्रजी
कुलश्रेष्ठ यांचे गत व विद्यमान शासन व समाज व्यवस्थेवर प्रबोधनपर व्याख्यान झाले . आलेल्या शंभु भक्तांना ग्रामस्थ व समिती तर्फे पाणी व भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती . शिक्रापुर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .
स्वागत भंडारे सर यांनी व सुत्र संचालन अमोल दरेकर यांनी केले .

15व्या वर्षी एकूण 13 भाषांचे ज्ञान
छ. संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी एकूण 13 भारतीय आणि विदेशी भाषांचे ज्ञान घेतले होते. त्यात मराठी, संस्कृत, इंगजी, हिंदी आणि पोर्तुगिज या सारख्या भाषांचा समावेश आहे. छ. शिवाजी महाराज यांचे मोठे सुपुत्र संभाजी राजे भोसले (Sambhaji Raje Bhosle) महाराज यांचा 1 एप्रिलला स्मृतिदिन आहे. धर्मवीर, शेर शिवा का छावा, अनेक भाषा वर आपले प्रभुत्व मिळवणारे, धर्म अभिमानी, संस्कृत पंडित, पराक्रमी, व्यासंगी, शूरवीर अशी अनेक विशेषज्ञ देऊन ही ज्यांची कीर्तीच वर्णन करताना शब्द अपुरे पडतात, असे छत्रपती संभाजीराजे भोसले.

इतिहासात…
सुमारे 40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करून ही छत्रपती संभाजी राजांनी स्वराज्य निष्ठा व धर्म निष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारत वर्षाने धर्मवीर ही पदवी बहाल केली. औरंगजेबाने क्रूर अत्याचाराची परिसीमा गाठली, तरी छत्रपती संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. धर्म अभिमानी, शेर का छावा छत्रपती संभाजी महाराजांची 11 मार्च 1689 रोजी फाल्गुन अमावास्यला प्राणज्योत मालवली.

