गरजुंना अन्नदान..एक हात मदतीचा ..कै.सुशीला जिजाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ कातकरी वस्तीतील गरजुंना अन्नदान ….

प्रतिनिधी योगेश राजापुरकर

राजगुरुनगर – येथील आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरसकार विजेते सेवानिवृत्त विस्तार अधिकारी मा.श्री.जि.रं.शिंदे गुरुजी यांच्या पत्नी कै.सुशीला शिंदे यांचे अल्पशा आजाराने १३ दिवसांपुर्वी दु:खद निधन झाले. कै.सुशीला शिंदे यांचा रानमळा येथे दशक्रिया विधी आणि राजगुरुनगर येथे तेरावा विधी पार पाडला. शिंदे परिवाराने सामाजिक कार्यकर्ते कैलास दुधाळे यांना बोलावुन एक कल्पना मांडली की कै.सुशीला शिंदे यांच्या स्मरणार्थ आपण अतिशय गरजुंना ५००० रुपयांचे अन्नदान करुयात.

त्यानुसार चांडोली जवळील कातकरी वस्तीतील वंचित घटकांना ३० मार्च २०२२ रोजी सायंकाळी ७:०० वाजता राजगुरुनगर मधील सामाजिक कार्यकर्ते कैलास दुधाळे,मछिंद्र पवळे,संजय घुमटकर सर,नितीन वरकड सर,प्रविण गायकवाड, वैभव वाघमारे, जितेंद्र बोऱ्हाडे, सचिन कारले, अमिर पाटोळे एकनाथ सांडु पाटील यांच्या हस्ते अन्नदान वाटप करण्यात आले. यावेळी शिंदे परिवारातील ज्येष्ठ सदस्य मा.जि.प.सदस्य श्री.पी.टी.शिंदे गुरुजी व कै.सुशिला शिंदे यांचे चिरंजीव श्री.जयदीप जिजाराम शिंदे यांनी या उपक्रमासाठी अन्नदान वाटप करणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे मनापासुन आभार मानले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते श्री.कैलास दुधाळे यांनी सांगितले की लग्न समारंभ, वाढदिवस, दशक्रिया, काल्याचे किर्तन किंवा अन्य काही कार्यक्रमांमधे आपण मोठ्या प्रमाणात अन्नदान करत असतो. त्यावेळी छोट्या मोठ्या प्रमाणात का होईना समाजातील अतिशय वंचित असलेले घटक म्हणजे कातकरी किंवा ठाकरसमाज यांच्यासाठी सुध्दा अन्नदानाचा व्हावा .आपल्या आजुबाजुला अशा अनेक वस्त्या असतील तिथे अन्नदानाची खरी गरज आहे तिथे अन्नदान करावे.

शिंदे परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्री.पी.टी.शिंदे गुरुजी मा.श्री.जि.रं.शिंदे गुरुजी श्री.जयदीप शिंदे व परिवाराने कै.सुशिला जिजाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ गरंजुना अन्नदान करुन या मातेला श्रध्दांजली समर्पित केली. व समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे त्याबद्दल शिंदे परिवाराला धन्यवाद दिले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!