वाशीम वार्ता :- रस्ता खराब असल्याचे कारण सांगत बाळंतीण महिलेला अर्ध्या रस्त्यात ऊतरवले
वाशीमच्या गणेशपूरची संतापजनक घटना
ही बातमी स्वराज्य वार्ता ने दिनांक 29 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी प्रसिद्ध केली होती.
https://swarajyavarta.in/?p=783
त्या बातमीची दखल घेत सदर चालकावर रुग्णालय प्रशासनाने कारवाई केली आहे.
(पत्र संदर्भ)
व्यवस्थापक मे अशकोम प्रा.लि.
भोपाळ
विषय: श्री. पुरुषोत्तम चव्हाण यांनी कामात केलेल्या हलगर्जीपणा बाबत बातमी दि.२९-१०-२०२१
वरील संदर्भीय विश्वास अनुसरून आपणास कळविण्यात येते कि, श्री. पुरुषोत्तम चव्हाण (वाहन चालक, अशकोम प्रा.लि.) हे दि. २६-१०-२०२१ ला गणेशपूर ता. रिसोड येथील गरोदर मातेला प्रसूती नंतर घरी नेऊन सोडत असताना सदर मातेला घरापर्यंत न सोडता रस्त्यात सोडून दिले. त्यामुळे आरोग्य विभाग बद्दल संताप व्यक्त होत आहे त्यामुळे आपल्या स्तरावरून सदर वाहन चालक यांच्या विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात यावी. व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ह्या कार्यालयात सादर करावा.
जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय वाशिम
प्रतिलिपी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय वाशिम
काय होते नेमके प्रकरण
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-रस्ता खराब असल्याचे कारण सांगत रुग्णवाहिका चालकाने अवघ्या तीन दिवसाच्या बाळंतीण महिलेला लहान चिमुरड्या सह अर्ध्या रस्त्यात सोडल्याची घटना वाशीम च्या गणेशपूर गावात घडली. घडलेल्या घटनेमुळे आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे.याविषयी बातमी प्रकाशित करताच सबंधित रुग्नवाहीकेच्या चालकाची चौकशी करुन कठोर कारवाईचे आदेश प्रशासनाने दिले आहे.
वाशीम च्या रिसोड तालुक्यातील गणेशपूर गाव रिसोड पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतर असलेल गाव या गावातील महिला उषा सावंत या महिलेची प्रसूती साठी २४ तारखेला वाशीम च्या जिल्हा सामान्य रुग्णालय इथे दाखल करण्यात आले.आणि नैसर्गिक पद्धतीने बाळंतपण नैसर्गिक पद्धतीने झाले व कन्या रत्न जन्माला आले आणि २६ तारखेला डिस्चार्जही मिळाला मात्र या गावाला जोडणारा रस्ता खराब असल्याचं कारण सांगत १०८ / १०२ क्रमांक द्वारा रुग्ण सेवा पुरवणाऱ्या रुग्णवाहिकेच्या कंत्राटी चालकाने या महिला आणि त्यांच्या चिमुकलीसह त्यांच्या सहकारी असलेल्या महिलेला भर रस्त्यात खाली उतरवले आणि इथून पुढचा प्रवास तुम्ही करा अस सांगितले.मात्र शासन नियमाने प्रसूती झालेल्या महिलेला बाळासह त्यांच्या घरी सोडण्याची जबाबदारी रुगवाहिकाच्या चालकाची आहे असे वेळोवेळी चालकाला सांगितले असता घरी सोडण्याची विनवणीही महिला आणि त्यांचे सासरे यांनी केली मात्र रस्ता खराब असल्याचे कारण सांगून भर रस्त्यात अर्ध्यावर सोडले.
काही किलोमीटर पायी चालल्या नंतर मागून येणाऱ्या एका वाहनाने महिलेला गावात नेवून सोडले मात्र चालकाने तुमचे रस्ते खराब आहे तुम्ही आमदार खासदार यांना बोला असं उत्तर दिल्याचा आरोप रुग्ण महिलेच्या नातेवाईकांनी केला.असा संतापजनक घडलेला प्रकार बद्दल वाशीम चे जिल्हा शल्य चिकित्सक डी बी खेडकर यांनी घडलेला प्रकार निंदनीय असून त्या कंत्राटदार कंपनीला पत्रव्यवहार करून त्या चालकाला कमी करणार असल्याचे सांगितले होते त्याप्रमाणे त्या रुग्नवाहिकेच्या चालकाची चौकशी करुन कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
आज तंत्रज्ञानाने प्रगती केली असली तरी लोकप्रतिनिधी च्या दुर्लक्षा मुळे रस्त्याचा विकास होऊ शकला नाही तरी अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने रुग्णवाहिके चे वाहनचालक मुजोर झाले.किमान वाशीमच्या या घटने नंतर तरी अश्या मुजोरावर कारवाई होऊन ही यंत्रणा सुधरेल अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम