आळंदीसाठी आणण्यात आलेल्या जलवाहिनीची गळती सुरू ; अवघ्या महिन्याभरापूर्वीच झाले होते योजनेचे लोकार्पण

प्रतिनिधी सुनील बटवाल

चिंबळी दि२९ ( वार्ताहर)  पुणे शहराच्या जलशुद्धीकरण केंद्र कुरुळी येथील जॅकवेल पासून टॅपिंग करून आळंदीसाठी आणण्यात आलेली भामा -आसखेड धरणाच्या पाण्याची केळगाव (ता.खेड) गावातून गेलेली जलवाहिनी रविवारी रात्री फुटली असून लाखो लीटर पाणी वाया गेले आहे.

पालिकेने सदर गळती थांबवून दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.सदर जलवाहिनी फुटल्याने जलवाहिनीतील पाणी वेगाने रस्त्यावर वाहू लागले यामुळे आळंदी – केळगाव रस्ता जलमय झाला होता येथील नागरिकांच्या घरात देखील पाणी गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.सुरुवातीला ही जलवाहिनी पुणे महानगरपालिकेची असल्याचे समजून नागरिकांनी महानगरपालिकेला कळविले होते त्यांनी याठिकाणी खड्डा घेऊन चेक केले असता सदर जलवाहिनी आळंदी नगरपरिषदेची असल्याचे दिसून आले.त्यानंतर ते कर्मचारी निघून गेले आळंदी नगरपरिषदेला कळविण्यात आल्या नंतर पालिकेने सदर जलवाहिनी पाणी पुरवठा बंद केला असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.


   दरम्यान अवघ्या महिन्याभरा पूर्वीच सदर पाणी योजनेचे लोकार्पण झाले होते.जलवाहिनी वॉशआउट करून शहराला पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता त्यातच आता जलवाहिनी फुटल्याने जलवाहिनीच्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहे.जलवाहिनी देखभाल दुरुस्तीसाठी आळंदी नगरपरिषदेची यंत्रणा अपुरी पडत असल्याने दुरुस्तीसाठी विलंब लागत असून त्याचा परिणाम पाणी पुरवठा व्यवस्थेवर होत आहे. 

सदर रस्त्यावर दोन्ही ठिकाणी गळती झाली होती. एक ठिकाणचे दुरुस्ती काम पूर्ण झाल्या नंतर पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता मात्र त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी गळती सुरू झाली.त्याठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.दरम्यान गळतीच्या वेळी आळंदीत हवेली विभागात रोटेशन नुसार पाणी पुरवठासुरू होता.त्या विभागाला पाणी टंचाईचा सामना करा

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!