दिल्ली वेस राहदारीसाठी खुली करण्याची मागणी ,नगरसेवकांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

प्रतिनिधी फुलचंद भगत :-


वाशिम:-कारंजा शहरातील मध्यवस्तीतील मेन रोडवरील दिल्ली वेश दुरुस्तीच्या कामाकरीता पाडून ठेवण्यात आलेली आहे. परंतु गेल्या चार वर्षांपासून वेस दुरुस्तीचे काम संतगतीने सुरू असून मागील तीन वर्षांपासून निधी अभावी काम पूर्णपणे रखडले आहे. रखडलेल्या या कामाकडे लक्ष देऊन नागरिकांना राहदरीस मार्ग उपलब्ध करुन द्यावा या मागणी करीता मो.युसूफ पुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवकांनी जिल्हाधिकारी षण्मुराजन एस यांची भेट घेऊन समस्येबाबत अवगत केले तसेच त्यांनी सकारात्मक प्रतिसाद ही दिला
.

    सविस्तर असे की, कारंज्याच्या वैभवशाली चारही वेशी या ऐतिहासिक आहेत. अशा स्थितीत शहरातील पूर्व दिशेस दारव्हा वेस, पश्चिमेस पोहा वेस, उत्तरेस दिल्ली वेस, दक्षिणेस मंगरूळ वेस या ऐतिहासिक ठेवा असलेल्या वेशी शहराला लाभलेल्या आहे. काही काळाअगोदर या चारही वेशींची अवस्था शिकस्त झाल्यामुळे अत्यंत दयनीय होती. या चारही वेशीतून नागरिकांचे व वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन असल्यामुळे व काही वेशींच्या बाजूला नागरी वस्ती असल्यामुळे या शिकस्त वेशी कधीही कोसळून जीवित व वित्तीय हानीसुद्धा संभवत होती. इ.स.२०१२-१३ मध्ये यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला. त्यातून मंगरूळ वेशीचे काम पूर्ण झाले व ती नागरिकांच्या आवागमनास आता जनसेवेत रुजू झाली आहे.

पोहा वेशीचे काम ९० टक्के पूर्ण झाले. परंतु, काही निधीअभावी रखडले तसेच दिल्ली वेशीचे कामही निधीअभावी रखडले आहे. दिल्ली वेस या मार्गाने जाणाऱ्या बहुसंख्य कॉलोनी तील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन कारंजा नगरसेवक यांनी मो युसुफ पुंजानी यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षाविधिन मुख्याधिकारी कुलदीप जंगम यांना दि.२७ ऑक्टोबर रोजी निवेदन सादर करून त्वरित या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी केली. तसेच २८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी षण्मुराजन एस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली. या वेळी ज्येष्ठ नगर सेवक एम.टी.खान, गटनेते ऍड.फिरोज शेकूवाले, सभापती सलीम गारवे, जाकीर शेख,नगरसेवक सैय्यद मुजाहिद उपस्थित होते. 

मुख्याधिकारी जंगम यांना निवेदन

मुख्याधिकारी तसेच सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मुख्य मार्गावरील दिल्ली वेशीची इमारत पाडून आज जवळपास दोन वर्ष झालेले आहे, त्यपुढे कोणतेही काम झालेले नाही, तसेच सदर इमात पाडतांना मेनरोड वर रस्त्याच्या मध्यापर्यंत टिनाचा कठडा तयार केलेला आहे.त्यामुळे रस्त्याचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग हा व्यापला गेलेला आहे त्यामुळे त्याचा रस्त्यावरील वाहतुकीस नेहमीच अडथळा येतो व रस्त्यामध्ये नेहमीच नागरीकांमध्ये वादविवाद होऊन मारामारी पर्यंत गोष्ट जाते. त्याचप्रमाणे सदर रस्ता हा शहराचा मुख्यमार्ग आहे व सद्या सणाचे दिवस असल्याने रस्त्यावर खुपच गर्दी होत आहे व वारंवार नागरीकांमध्ये वादविवाद होत आहेत.आणि आजरोजी सदर वेशीची इमारत ही पूर्णपणे पाडून ठेवण्यात आलेली आहे.

व वेशीच्या दुरुस्तीचे कोणतेही काम चाललेले नाही, त्यामुळे आजच्या परीस्थितीत तेथे कोणत्याही प्रकारची हानी होण्याची शक्यता नाही उलट वाहतुकीस अडथळा होत आहे तसेच कोरोना महामारीचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

तसेच वेशीच्या मागील भागात काजी प्लॉट, लाहोटीनगर, टीचर कॉलनी, लक्ष्मीनगर, विदर्भ कॉलोनी, आनंद नगर,बिलाल नगर, जिया कॉलोनी, मेमन कॉलोनी, इंगोले नगर इ. वस्त्या आहेत, त्याचप्रमाणे शहरातील प्रसिध्द के.एन.कॉलेज, चवरे कॉलेज, फातेमा मस्जीद, जैन मंदिर, बिलाल मस्जीद यासारख्या मोठे शिक्षणसंस्था व धार्मीक संस्था आहेत व तेथील नागरीकांना जाण्यासाठी वेशीच्या मागील भागात मेमन जमातखाना जवळ फक्त एकच पर्यायी रस्ता आहे आणि तो सुध्दा वाहतुकीस अतीशय अडचणीचा आहे व त्याठिकाणी सुध्दा रोजच नागरीकांमध्ये वादविवाद होत असतात, त्यामुळे या सणासुदीच्या काळात वादविवाद होऊन शहरातील वातावरण दूषित होऊन कायदा व्यवस्था बिघडण्याची पूर्ण शक्यता आहे, यास्तव मेन रोड वरील वेशीच्या समोरील भागामध्ये लावण्यात आलेला टिनाचा कठडा काढून वेशीचा रस्ता खुला करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली .

यावेळी नप उपाध्यक्ष जुम्मा पप्पूवाले, गटनेता फिरोज शेकूवाले, शिक्षण सभापती अ एजाज,चांद शा, नगरसेवक झाकीर शेख,सलीम गारवे, सौ वर्षाताई इंगोले,सलीम प्यारेवाले, जावेदोदिन,युनूस पहेलवान, अ.रशीद,इरफान खान,झाकीर अली,इर्शाद अली,सै मुजाहिद,निसार खान,सौ प्रतिभा इंगोले,चंदन गणराज आदी उपस्थित होते.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!