Post Views: 313
“” तालुकाध्यक्ष अजय वाहुरवाघ यांच्या प्रयत्नाने न.प. प्रशासनाने अपंग ५% निधी वाटप”
अंजनगाव सुर्जी ; रवी मारोटकर
गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळामुळे सर्वसामान्य माणसाची परिस्थिती खूप गंभीर झाली आहे त्यात निराधार अपंग हा तर भिकेला ला लागलेला आहे अशा खूप गंभीर आणि हालाखीच्या परिस्थितीत शासनाचा कायदा 2016 अंतर्गत पाच टक्के निधी अजून पर्यंत त्यांना तालुक्यातील ग्रामपंचायत, व नगर परिषद अंतर्गत मिळाला पाहिजे होते .परंतु अपंगाना गेल्या काही वर्षात त्यांचा हक्क अधिकाराका पासुन वंचित राहावे लागले होते. तर काहीना अपंगाना ५% निधी योजना अनुदानापासून आज पर्यंत वंचित राहावे लागले आहे.
हि सर्व बाब लक्षात आल्यानंतर अपंग जनता दल तालुकाध्यक्ष अजय वाहुरवाघ यांनी पुढाकार घेऊन दिनांक 18/ 2 /2022 रोजी अपंगांच्या पाच टक्के निधी आणि घरकुल मध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे. असे निवेदन नगर परिषद अंजनगाव सुर्जी यांना सादर केले होते.
या निवेदनाची नगर परिषद प्रशासनाने दखल घेवुन अंजनगाव सुर्जी शहरातील अपंगांना पाच टक्के निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला
हे काम वरिष्ठ लिपिक श्री राम कृष्ण सोळंके यांच्या अंतर्गत पार पडले.अंजनगाव सुर्जी शहरात एकूण 517 अपंगाची यादी आहे त्यामध्ये अस्थिव्यंग 271 अंध 88 मतिमंद 106 मूकबधिर कर्णबधिर 52 एकुण 517 अपंग आहेत त्यांच्यासाठी ४लाख १५ हजार रुपये इतका निधी वाटप करण्यात आलेला आहे.