रूपीनगर मध्ये युगपुरुष समूहशिल्पाचे लोकपर्ण सोहळा

प्रतिनिधी आर.एन.माळी

पुणे वार्ता :- दिनांक -21.03.22.आज शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे औचित्य साधून महायुग पुरुषांच्या समूह शिल्पाचे अनावरण स्वर्गीय भामाबाई हिरामण गरुड चौक रुपीनगर मध्ये संपन्न झाला. या समूह शिल्पाची संकल्पना नगरसेविका पौर्णिमाताई सोनवणे व सामाजिक कार्यकर्ते रविंद्रआप्पा सोनवणे तसेच त्यांचे कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आले आहे.

या समूह शिल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांचे शिल्प ,विठ्ठल मूर्ती, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर,राजमाता जिजाऊ व शिवराय,महात्मा जोतिराव फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज,तसेच विविध मंदिरे व गडकिल्ले यांचे समूह शिल्प सुंदर प्रकारे तयार करण्यात आले आहे. या शिल्पामुळे रूपीनगरचे सौंदर्य वाढले आहे.समाजाच्या दृष्टीने या समूहशिल्पाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी,एकता जोपासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला रूपीनगर मधील कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!