कोरोना माहामारित लेबॉरेटरी तंत्रज्ञांचे कार्य देवदुता प्रमाणे – पद्मश्री डॉ प्रकाश आमटे

प्रतिनिधी फुलचंद भगत :-


वाशिम:- कोरोना वैश्विक महामारित सर्वात जास्त बाधित रुग्णाची सेवा जर कोणी केली असेल तर लेबॉरेटरी तंत्रज्ञाने केली आहे,ज्याची तुलना कोणाशीही होवुच शकत नाही, परिवारातील एखाद्या सदस्याला कोरोना संक्रमक झाले तर त्या परिवारातील सदस्य बाधित रुग्णाकडे जात नव्हता अशा प्रतिकुल परिस्थितीत ही लेबॉरेटरी तंत्रज्ञाने जी रुग्ण सेवा केली ती एखाद्या देवुदुता प्रमाणे केली असुन कोरोना माहमारित लेबॉरेटरी तंत्रज्ञ हा बाधित रुग्णांचा देवदुतच बनला होता असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक,रोमन मँगाससे पुरस्कार प्राप्त पद्मश्री डॉ प्रकाश बाबा आमटे यांनी केले,

लेबॉरेटरी अँनालिस्ट अँक्टिव्ह फोरम फॉर अँक्शन (लाफा) द्वारे आयोजित पहील्या राज्यस्तरीय महा अधिवेशनात ते व्हिडीओ कॉन्फरंन्सिगवर प्रभात किडस् स्कुल येथील कार्यक्रमात ते बोलत होते.


अकोल्याचे सुप्रसिद्ध पँथॉलॉजिस्ट डॉ राजेश काटे यांनी तर पेरिफेरल ब्लड स्मिअर (Peripheral Blood Smear) या विषयांवर खुपच मोलाचे मार्गदर्शन करुन सभागृहात एक उत्साह वर्धक वातावरण तयार केले सर्व लँब धारक बांधव त्यांच्या मार्गदर्शनाने मंत्रमुद्ध झाले होते,कोरोना महामारित लेबॉरेटरी तंत्रज्ञाने रुग्ण सेवा करुन कोरोना बाधित रुग्णांचे देशात करोडो स्बँब कलेक्शन करुन त्यांच्या चाचण्या केल्या,जीवाची पर्वा न करता बाधित रुग्णांची सेवा केली,राज्यातील जवळपास ४३ लेबॉरेटरी तंत्रज्ञांना कोरोना मुळे जीव सुद्धा गमवावा लागला.

एवढे असुन ही लेबॉरेटरी तंत्रज्ञांवर अन्याय होत आहे,काही लोकांना सरकारच्या आरोग्य विभागातुन काढले जात आहे, या अन्याया विरुद्ध आवाज बुलंद करण्या साठी राज्यातील लेबॉरेटरी धारक तंत्रज्ञ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती, लाफा फोरम च्या माध्यमातुन सरकार पर्यंत या बाबी पोहचवुन न्याय मिळे पर्यंत शांत बसणार नाही असे लाफा मिट २०२१ चे आयोजक अध्यक्ष मंगेश ठाकरे यांनी केले, तर कोणीही येतो कोणतेही शिक्षण घेतो नाही, किंवा घेतले सुद्धा नाही, एखादा कोर्स करतो,मशिनरी घेवुन लेबॉरेटरी टाकतो, अशा परामेडीकल कॉन्सिल मधे रजिस्ट्रेशन नसलेल्या लँब तंत्रज्ञांच्या लेबॉरेटरी वर कारवाई करावी व लेबॉरेटरी टाकण्यापुर्वी कॉन्सिल मधे नोंदणी आहे कि नाही याची खात्री झाल्यानंत्तरच लेबॉरेटरी टाकण्याची परवानगी देण्यात यावी असा कडक नियम करावा असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे लाफा प्रदेश संघटन रवि गजानन येवले यांनी केले.

कार्यक्रमा चे अध्यक्षस्थान भुषविलेले तथा प्रभात किडस् स्कुल चे संचालक डॉ गजानन नारे यांनी सुद्धा अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले,कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रमुख अतिथी प्राध्यापक सुहास उदापुरकर यांनी लेबॉरेटरी तंत्रज्ञ हा वैद्यकीय सेवेचा पाया आहे,व रोग निदाना संबंधिच्या सर्व चाचण्या ईमानदारीने करतात अशा भावना व्यक्त केल्या, महाराष्ट्र परावैद्यक परिषदेचे सदस्य तथा कार्यक्रमा करिता विषेश निमंत्रीत विवेक अंगाईतकर यांनी परिषदेच्या कामाला गती देण्याचे आश्वासन दिले तर परिषदेचे सदस्य तथा विषेश निमंत्रित संजय सरोदे अकोला यांनी कोणत्याही लेबॉरेटरी तंत्रज्ञांवर अन्याय होणार नाही याची ग्वाही दिली, लाफा प्रदेश कार्याध्यक्ष धर्मेंद्र मगरे यांनी लेबॉरेटरी तंत्रज्ञांवर होणारा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही व गरज पडली तर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे सांगितले,.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लाफा मिट २०२१ आयोजन समिती अकोला व वाशिम जिल्ह्याच्या टिम ने खुप सहकार्य केले, कार्यक्रमाला लाफा कोअर कमिटी सदस्य मारोती धर्माधिकारी, केतन औसरकर,राजेंद्र बागुल,मधुकर सानप,योगेश देशमुख, यांचे सुद्धा मार्गदर्शन झाले, नागपुर वरुन खास निमंत्रित अरुण विंचुरकर यांनी सुद्धा कार्यक्रमाचे खुप कौतुक केले,मनिष देशमुख,नितीन देशमुख, विजय दांदळे, प्रविण देशमुख, पंडीत जाधव, प्रशांत खनगङे, मो. मुस्दीक, श्रीहरी पाबळे, शिवा सोनोने , राजेश जामनिक, राजेश मुळे, आङोळे ,भरत शिंदे, अमोल अवताङे, योगेश सुरटकर, संतोष जाधव, निलेश प्रांजळे, विद्या भगत, दिपक गवळी अकोला ,मंगरुळपिर व वाशिम येथील लँब तंत्रज्ञांनी या करिता खुप मेहनत घेतली, कार्यक्रमाचे सुत्र संचालन रविंद्र समदाणी व चंद्रकांत डंबाळे गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन शशि कांत पाथ्रिकर यांनी केले,लाफा मिट अकोला कार्यक्रमाला महाराष्ट्रातुन प्रत्येक जिल्ह्यातील लँब तंत्रज्ञ मोठ्या संख्येने हजर होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!