अमरावती महानगरपालिकेचे मुलांचे ओपन प्लेस खेळाच्या मैदानावर औद्योगिक कारखान्याने केला ताबा

अमरावतीमहानगरपालिकेचे मुलांचे ओपन प्लेस खेळाच्या मैदानावर औद्योगिक कारखान्यासाठी सातुर्णा येथील केला ताबा,

सातुर्णा येथील संपूर्ण महिला व नागरिकांचा महानगर पालिकेवर धडक मोर्चा

नागरिकांची प्रतिक्रिया पहा व्हिडओ

नवीन सातुर्णा येतील कित्येक वर्षापासून लहान मुलांसाठी ओपन प्लेस जागाही महानगरपालिका कडून सोडण्यात आली होती त्या ओपन प्लेसमध्ये आधी लहान मुलांचे विविध प्रकारचे खेळणे महानगरपालिकेच्या विकासा मधून बसवण्यात आले होते काही महिन्यापासून एक एक सामान करून पूर्ण खेळण्याचे सामग्री तेथून हलविण्यात आले व 2 ते 3 वर्षानंतर औद्योगिक वसाहत सातुर्णा एमआयडीसी यांनी या ठिकाणचे खेळणे हे रातोरात काढून त्याठिकाणी वालकट कंपौंड बांधण्याचे काम अनधिकृतपणे सुरू करण्यात आले होते.

सदरची जागा ही महानगरपालिकेची असतांना सिद्धा जागेवर औद्योगिक वसाहत यांनी अतिक्रमण केले ही बाब नगर वाशी यांच्या लक्षात येताच नागरिकांनी पूर्णपणे विरोध दर्शविला व त्यांनी त्यांच्या बळावर पोलीस प्रशासन व मनपाचे काही अधिकारी यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी बांधकाम सुरू करण्यात आले होते .

त्यानंतर सातुर्णा येथील नगर वासियांनी नवीन नक्शा व या ठिकाणी झालेल्या कामाची प्रत दाखवण्यास सांगितले तर ते उडवाउडवीचे उत्तर देत होते तसेच माजी नगरसेवक व उपमहापौर रामभाऊ सोळंके यांच्या लक्षात एक घटना लक्षात आणून दिली व धीरज वंजारी तसेच रामभाऊ सोळंके यांनी त्या अधिकाऱ्यांना विचारपूस केली असताना त्यांच्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता तरी आज संपूर्ण नागरिक यांना घेऊन महानगरपालिका चे आयुक्त साहेब अमरावती यांना भेटण्याकरिता संपूर्ण सातुर्णा नगर वाशी यांनी महानगरपालिके वर धडक मोर्चा घेऊन गेले होते.

परंतु आयुक्त साहेब हजर नसल्यामुळे उपायुक्त साहेब यांना निवेदन देऊन परत यावे लागले पुढील कारवाई लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्‍वासन उपायुक्त साहेब यांनी दिले रामभाऊ सोळंके यांच्या नेतृत्वात संबंधित मोर्चामध्ये धीरज वंजारी अरुण मदनगर मनोज कुकडकर राम ठाकुर विक्रम राठोड गजानन दुर्गे विकास मारोडकर उमेश काळे मंगेश नेरकर राजेश बेलपत्रे सीमा राठोड नेरकर ताई ढोके ताई तसेच भरपूर प्रमाणात महिलावर्ग व नगरवासी नागरिक उपस्थित होते.


प्रतिनिधी रवि मारोटकर ब्युरो चीफ

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!